नाशकात मराठा समाजाचा देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानी थाळीनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:52 PM2018-08-04T15:52:02+5:302018-08-04T15:54:12+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात अला असून मराठा समाजाच्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने शनिवारी (दि.४)आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून केली.
नाशिक :मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या ठोक आंदोलनात फडणवीस सरकारने निलेश राणेंसारख्या व्यक्तींच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा क्रांती मोर्चात फुट पाडण्याचे पाप करू नये. अन्यथा सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात अला असून मराठा समाजाच्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने शनिवारी (दि.४)आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलनाच्या माध्यमातून केली. आरक्षणांसह अन्य मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून नाशिक जिल्ह्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोब, थाळीनादासोहत ठिय्या आंदोलनाची मालिका सुरू आहे. या आंदोलनाच्या शृंखलेत शनिवारी आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर सुनिल बागूल यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन केले. राज्यात आंदोलक आक्र मक झाल्यानंतर सरकारच्या हालचाली गतीमान झाल्या असल्या तरी सरकार मराठा समाजाता गैरसमज निर्माण करून फुट पाडण्याच्या हेतूने लुडबुड्यांचा वापर करीत असल्याचा आरोप यावेळी करीत आंदोलकांनी केला. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रक्रीयेला गती देण्यासह, बिनव्याजी कर्ज पुरवठा, छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती, सारथी यासारख्या निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ करावी आदि मागण्या करतानाच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्या.दरम्यान, देवयानी फरांदे यांनी मराठा समाजाच्या भावना रास्त असल्याचे सांगत मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी करण गायकर ,राजू देसले, तुषार जगताप, गणेश कदम, उमेश शिंदे, तुषार गवळी, माधवी पाटील,पुजा धुमाळ, मनोरमा पाटील,चेतन शेलार, विलास जाधव, संदीप लभडे, अॅड. शरद कोकाटे, शरद तुंगार,मंगला शिंदे आदी उपस्थित होते.
समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र
निलेश राणे आणि रूपाली पाटील यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनीफित सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यात निलेश राणे यांच्या बोलण्यातून काही मराठा संघटनांचे प्रतिनिधी मराठा क्र ांती मोर्चाचे भांडवल करून सरकारसोबत तडजोड करीत असल्याचा संदेश पसरविला जात आहे. या ध्वनीफितीच्या माध्यमातून सरकारच्या हस्तकांचा मराठा समाजात फुट पाडण्याचा कुटील प्रयत्न असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला असून तडजोड करणाºयांविरोधात सरकारने पुरावा जाहीर करण्याचे आव्हानही मराठा क्रांती मोर्चाने दिले आहे.