कसबे सुकेणेला लागणार देवाचे लग्न ! शेकडो वर्षांची परंपरा : भैरवनाथ-जोगेश्वरी मातेचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:07 AM2018-03-05T00:07:34+5:302018-03-05T00:07:34+5:30
कसबे सुकेणे : आरती, तेलवण, हळद, मल्हारी गीत, मांडव आणि रंगात न्हाऊन निघालेले गावकरी, भाविक असा माहोल सध्या कसबे सुकेणे गावात दिसून येत आहे.
कसबे सुकेणे : आरती, तेलवण, हळद, मल्हारी गीत, मांडव आणि रंगात न्हाऊन निघालेले गावकरी, भाविक असा माहोल सध्या कसबे सुकेणे गावात दिसून येत आहे. शेकडो वर्षांची परंपरा गावकºयांनी अखंडपणे जपली आहे. सुकेणेकरांच्या दारी मांडव पडल्याने सारं गाव देवाच्या लगीनघाईत आहे. भैरवनाथ-जोगेश्वरी मातेचा विवाह सोहळा अर्थात रथोत्सव सोमवारी (दि.५) होत आहे. या सोहळ्यासाठी कसबे सुकेणेनगरी सज्ज झाली आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात भैरवनाथांचे मंदिर असून, ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. सालाबादप्रमाणे सोमवारी रथोत्सव सोहळा होत असून, संपूर्ण गाव या रथोत्सवासाठी सज्ज झाले आहे. गावाच्या पश्चिमेला असलेल्या जानोसा मंदिरात रथोत्सवाची सांगता होते. रथोत्सवानिमित्त यात्रोत्सव साजरा केला जातो. कुस्त्यांची दंगल व लोकनाट्याचा कार्यक्र म होणार आहे. यात्रेच्या तयारीसाठी लक्ष्मण भंडारे, विश्वास भंडारे, मनोहर जाधव, छबू काळे, खंडेराव काळे, लक्ष्मण काळे, सुकदेव काळे, पोपट काळे, रामचंद्र काळे, चंद्रभान भोज, भिका भोज, विष्णू भोज आदी प्रयत्नशील आहेत. यात्रा काळात वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.