मोलमजुरी करून हाकतात वृद्धाश्रमाचा गाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:24 PM2017-09-26T23:24:42+5:302017-09-27T00:29:22+5:30
शिक्षण केवळ इयत्ता सातवी अन् विशेष म्हणजे स्वत: मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा चालवित असताना आपणही जगाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एका दांपत्याने वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शेखर देसाई ।
लासलगाव : शिक्षण केवळ इयत्ता सातवी अन् विशेष म्हणजे स्वत: मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा चालवित असताना आपणही जगाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एका दांपत्याने वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. येथून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले शिरसगाव येथील प्रियंका व नवनाथ नारायण जºहाड दांपत्याचे नाव आहे. लासलगाव येथील राजा शिवछत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते संजय बिरार, अजय धनवटे, डॉ. अरुण काळे व डॉ. नीलेश दळवी हे परिसरातल्या विविध गावात भेटी देऊन अभ्यास करीत असतात. येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसगाव लौकी येथे भटकंती करीत असताना कोणताही गाजावाजा न करता नवनाथ जºहाडे हे त्यांच्या गावी छोट्याशा घरात वृद्धाश्रम गेली चार वर्षांपासून चालवत असल्याची माहिती समजली. त्यामुळे लागलीच त्यांचे पाय आपसूकच या आगळ्या वेगळ्या वृद्धाश्रमाकडे वळले. थोडीफार शेती असणारे नवनाथ जºहाड यांच्या परिवारात पत्नी प्रियंका यांची मोलाची साथ आहे. त्यांना एक लहान मुलगी आहे. स्वत: नवनाथ शेतात मोलमजुरी करतात. प्रियंका या लोकांच्या शेतात कांदे लावणीची व मशागतीची मजुरी करतात. या पती पत्नी यांच्या मजुरीतून येणारे पैसे या पाच जणांच्या खर्चावर देऊन देखभाल करतात. नाशिक, विंचूर, चंद्रपूर, शेवगाव येथील पाच आजी- आजोबांचा पोटच्या मुलापेक्षाही अधिक चांगला सांभाळ करीत आहे. कमी शेती असूनही काही जागा नवीन बांधकामाकरिता या जºहाड परिवाराने दिली आहे. अजून वीस वृद्धांची व्यवस्था करण्यासाठी आश्रमाचे काम त्यांनी चालू केले आहे.
शिरसगाव येथे एका नागपूर परिसरातील नाव न सांगणाºया तपस्वीला वय जादा झाल्याने व प्रकृती खालावल्यामुळे
एकांतात आणले गेले. त्यांची सेवा केली. वृद्धाश्रमातील सातपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे क्रि या कर्म नवनाथ व प्रियंका यांनी केले.