गारठा : किमान तपमानाचा पारा १०.४ अंशांवर राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:16 AM2017-11-13T01:16:40+5:302017-11-13T01:17:48+5:30

शहराच्या किमान तपमानात घट झाल्यामुळे रविवारी पारा थेट १०.४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे राज्यात सर्वांत कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.

Hail: Mercury in the lowest temperature of 10.4 degrees was the coldest place in the state | गारठा : किमान तपमानाचा पारा १०.४ अंशांवर राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

गारठा : किमान तपमानाचा पारा १०.४ अंशांवर राज्यात नाशिक सर्वाधिक थंड

Next
ठळक मुद्देया आठवड्यात थंडीचा जोर वाढला फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठलेथंडीचा कडाका वाढणार

नाशिक : शहराच्या किमान तपमानात घट झाल्यामुळे रविवारी पारा थेट १०.४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे राज्यात सर्वांत कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून, नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तपमान १२ अंशांच्या जवळपास होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.४ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आहेत. हंगामातील हे सर्वांत निचांकी किमान तपमान नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेपासून ज्यांची दिनचर्या सुरू होते अशा घटकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागला. दूधविके्रते, पेपरविक्रेते, विविध गुणकार रसविक्रेत्यांसह सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते. मागील वर्षी थंडीचा कडाका १२ नोव्हेंबरला कमालीचा वाढलेला होता. त्यावेळी शहराचे किमान तपमान ९.६ इतके नोंदविले गेले होते. सूर्यास्तानंतर थंडीची तीव्रता वाढली असून, गोदाकाठावर शेकोट्या पेटवून मजुरी करणाºया कुटुंबीयांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी दुचाकीस्वार गरम कपडे घालून बाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. थंडीमुळे शहरातील खाऊगल्ल्याही रात्री लवकरच सुन्या झाल्या होत्या. रविवार मात्र सुटी असल्यामुळे खवय्यांची खाऊगल्ली भागात गर्दी दिसून येत होती; मात्र थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी तातडीने खरेदी व चंगळ आटोपती घेत घराकडे प्रस्थान केल्याचे दिसून आले. यामुळे रविवार असूनही रात्री साडेआठ वाजेपर्यंत बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. एकू णच चालू आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Hail: Mercury in the lowest temperature of 10.4 degrees was the coldest place in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.