मृत अर्भक घेऊन आजीची महापालिकेत धाव इंदिरा गांधी रुग्णालयाचा हलगर्जीपणा : प्रसूतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:40 AM2017-12-20T01:40:53+5:302017-12-20T01:41:45+5:30

पंचवटीतील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेकडे डॉक्टरांसह कर्मचारीवर्गाने दुर्लक्ष केल्याने मृत पावलेल्या नवजात नातीचे अर्भक घेऊन आजीबाईने थेट महापालिकेचे मुख्यालय गाठले.

Indira Gandhi hospital stays in her granddaughter with dead fetus: accused of neglecting childbirth, order of inquiry | मृत अर्भक घेऊन आजीची महापालिकेत धाव इंदिरा गांधी रुग्णालयाचा हलगर्जीपणा : प्रसूतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश

मृत अर्भक घेऊन आजीची महापालिकेत धाव इंदिरा गांधी रुग्णालयाचा हलगर्जीपणा : प्रसूतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप, चौकशीचे आदेश

Next
ठळक मुद्देसखोल चौकशीचे आदेश इंदिरा गांधी रुग्णालयात अनागोंदी कारभारविलंब लावल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप

नाशिक : पंचवटीतील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेकडे डॉक्टरांसह कर्मचारीवर्गाने दुर्लक्ष केल्याने मृत पावलेल्या नवजात नातीचे अर्भक घेऊन आजीबाईने थेट महापालिकेचे मुख्यालय गाठले. आजीबार्इंनी अतिरिक्त आयुक्तांच्याच टेबलावर मृत अर्भक ठेवत झालेल्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी साºया प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले. काही दिवसांपूर्वीच मायको रुग्णालयात एका गर्भवती महिलेची रिक्षातच प्रसूती होण्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ या घटनेमुळे इंदिरा गांधी रुग्णालयातीलही अनागोंदी कारभार चर्चेत आला आहे.
राहुलवाडी, पेठरोड येथील अशोक एकनाथ तांदळे यांनी त्यांची गर्भवती पत्नी आशा यांना पोटात कळा येत असल्याने सोमवारी (दि.१८) सकाळी ७ वाजेच्या सुमारास पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिचारिकांनी काही वेळ थांबण्याचा सल्ला दिला. परंतु, रात्रभर सदर महिला प्रसूतीकळांनी त्रस्त बनलेली असतानाही त्याकडे कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला. इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाºयांनी प्रसूतीसाठी विलंब लावल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत बाळाची आजी गंगूबाई लक्ष्मण खोडे व पती अशोक यांनी मृत अर्भक घेऊन थेट महापालिकेचे राजीव गांधी भवन गाठले.

Web Title: Indira Gandhi hospital stays in her granddaughter with dead fetus: accused of neglecting childbirth, order of inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.