लहवितच्या इसमाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:21 AM2017-09-12T00:21:41+5:302017-09-12T00:21:50+5:30
नाशिक : जिल्ह्यात दिवसेंदिवस स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या लहवित येथील इसमाचा सोमवारी (दि़११) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ भाऊसाहेब त्र्यंबक रेवागडे (४८, रा़ मारुती मंदिराजवळ, लहवित, नाशिक) असे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे़ त्यांच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू होते़

शरणपूर रोडवरील बाफणा ज्वेलर्स येथे सुरक्षारक्षकाचे काम करीत असलेले रेवागडे यांना आठ दिवसांपासून त्रास जाणवत होता़ त्यांनी यासाठी खासगी रुग्णालयात उपचारही घेतले, मात्र त्रास वाढल्याने त्यांना शुक्रवारी (दि़८) जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या त्यांच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सद्यस्थितीत चार रुग्णांवर उपचार सुरू असून त्यामध्ये चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे़ यापैकी दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल निगेटीव्ह आला असून, आज दाखल झालेल्या महिलेचा अहवाल येणे बाकी आहे़ भाऊसाहेब रेवागडे यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. शहरात सुमारे ५० पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. नागरिकांनी स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांनी केले आहे.