ग्रामस्वच्छता मूल्यमापन समितीकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:18 AM2018-03-27T00:18:29+5:302018-03-27T00:18:29+5:30
तालुक्यातील राजदेरवाडी येथील डोंगराळ परिसरातील कामांची पाहणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियांनातर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने केली. विकासकामे कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा सदर समितीने भेट दिली.
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथील डोंगराळ परिसरातील कामांची पाहणी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियांनातर्गत जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने केली. विकासकामे कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा सदर समितीने भेट दिली. यावेळी गावातील आयएसओ, मानांकित ग्रामपंचायत, आयएसओ जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तसेच गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था पनाबाबतच्या कामांची पाहणी समिती सदस्यांनी केली व समाधान व्यक्त केले. या समितीत मुख्य कार्यकारी अभियंता एन.एन. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी चिंचोले, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे समन्वयक संदीप जाधव यांचा समावेश होता. त्यांच्यासमवेत चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, ग्रामसेवक बी.पी. सोनवणे, सागर मोरे, विशाल सोनवणे, उपसरपंच मनोज शिंदे उपस्थित होते.
या समितीने ग्रामपंचायतीचे कामकाज, नॅडेप कंपोस्ट प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळा स्वच्छता व्यवस्थापन व अंगणवाडी यांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. घरे व गाव परिसराची स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक उपसरपंच मनोज शिंदे यांनी केले. ग्रामसेवक बी. पी. सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी सरपंच सखूबाई माळी, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, नंदराज जाधव, जगन यशवंते, सुरेश जाधव, पुंडलिक शिंदे, सुकदेव जाधव, भास्कर कापडणे, रमण जाधव, पंडित जाधव, काळू कापडणे, वसंत जाधव, जगन जाधव, नीलेश जाधव, नीलेश कापडणे, चांगदेव खुरसणे, राजाराम पवार, खंडू जाधव, राकेश कापडणे, मुख्याध्यापक नामदेव जाधव, ब्रह्मेश कदम, शीतल अहिरे, कृषी सहायक पी.पी. जाधव, कुंभार्डे व ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी समितीचे स्वागत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वेश परिधान करून केले. तालुकास्तरावर पात्र झालेल्या राजदेरवाडी, शिरसाणे, न्हनावे या तीन गावांपैकी राजदेरवाडी व शिरसाने या दोन गावांची समितीकडून पाहणी करण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे जिल्ह्यातील तीस गावांमधून निवड झालेल्या प्रथम तीन गावांमधून प्रथम दोन गावे विभागस्तरीय पाहणीसाठी पात्र होणार आहेत.