इंदिरानगरमध्ये तरुणास लोखंडी सळईने मारहाण
By Admin | Updated: July 14, 2017 17:41 IST2017-07-14T17:41:41+5:302017-07-14T17:41:41+5:30
इंदिरानगर परिसरातील ओढ्याजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एका भाजीपाला विक्रेत्या तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली

इंदिरानगरमध्ये तरुणास लोखंडी सळईने मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : इंदिरानगर परिसरातील ओढ्याजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एका भाजीपाला विक्रेत्या तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी या फिर्यादीच्या प्रकरणी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
इंदिरानगर परिसरातील भाजीपाला विक्रेता समीर रशीद शेख (२९) त्याच्या घराजवळ गप्पा मारीत उभा असताना अमोल भवर, जगदीश भवर व रघु पगारे या संशियितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सळईने व लाथाबुक्क्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात समीरला दुखापत झाली असून, झालेल्या झटापटीत २० हजार रुपये पडून नुकसान झाल्याची फिर्यादी समीरने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची अधिक चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सदाफु ले व माळी करीत आहेत.