विज्ञानाचे ज्ञान अनुभवानेच शक्य जयंत जोशी : विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:03 AM2018-02-11T01:03:06+5:302018-02-11T01:03:56+5:30
नाशिकरोड : अनुभवाशिवाय विज्ञानाची अनुभूती येत नाही. विज्ञान हे थेअरीच्या माध्यमातून शिकण्याचा विषय नसून विज्ञानाचे ज्ञान अनुभवाशिवाय शक्य नाही.
नाशिकरोड : अनुभवाशिवाय विज्ञानाची अनुभूती येत नाही. विज्ञान हे थेअरीच्या माध्यमातून शिकण्याचा विषय नसून विज्ञानाचे ज्ञान अनुभवाशिवाय शक्य नाही. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटरचे अभियंता डॉ. जयंत जोशी यांनी केले. पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित ‘अनुभूती विज्ञानाची’ या विज्ञान उपकरणांच्या तीनदिवसीय प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी डॉ. जोशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, खजिनदार वैशाली गोसावी, सहाचिव प्रसाद कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख सुषमा भानगावकर, मदन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते श्री सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. बीना बनकर व विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. सुषमा भानगावकर यांनी तीनदिवसीय प्रदर्शनाचा आढावा घेतला. तीन दिवसांत प्रदर्शनास सुमारे ५९ शाळांचे १०९१८ विद्यार्थी, २४० शिक्षक व ४६ मान्यवरांनी देऊन पाहणी केली. पाहुण्यांचा परिचय मृणाल धारणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्या महाले व आभार मदन शिंदे यांनी मानले.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, संजीवनी धामणे, ज्योती मोदीयानी, लीना पांढरे, शकुंतला परदेशी, रेखा हिरे, माधव मुठाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.