जेसीआय ग्रेपसिटीने सजविली जुन्या-नव्या गाण्यांची मैफल
By admin | Published: September 13, 2014 10:01 PM2014-09-13T22:01:12+5:302014-09-13T22:01:12+5:30
जेसीआय ग्रेपसिटीने सजविली जुन्या-नव्या गाण्यांची मैफल
नाशिक : ‘ग्रेपसिटी फेस्टिव्हल-२०१४’ अंतर्गत जेसीआय ग्रेपसिटीतर्फे गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पिन्याकल मॉल येथे घेण्यात आला. गायन क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक चांगले माध्यम उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश होता. स्पर्धा खुल्या गटातील असल्याने अनेक महाविद्यालयीन मुला-मुलींनी यामध्ये सहभाग घेतला. जुन्या-नवीन गाण्यांची एक सुरेल महफिल या ठिकाणी पाहण्यास मिळाली. सदर स्पर्धेतून तीन पुरुष व तीन महिला यांची निवड करण्यात आली असून, दि. १४ रोजी होणाऱ्या ग्रेपसिटी फेस्टिव्हलच्या समापन कार्यक्रमाच्या वेळी ग्रॅण्ड फिनालेमध्ये पुन्हा एकदा गाण्याची त्यांना संधी मिळेल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हसमुख पटेल, सुयोग वाघमारे उपस्थित होते. परीक्षणाचे काम तांबट यांनी पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ. पंकज जैन, चेअरमन पराग जोशी, सचिव मुकेश गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक नरेंद्र जाधव व मुकेश परदेशी यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी राजेश चंडालिया, स्वप्नील पवार, सुनील बोरसे, नंदकिशोर चोरडिया, मनीष दशपुत्रे, संजय जाधव, जितेंद्र बोरा, वसंत कुरूप, सुप्रिया जैन, सारिका वाघमारे, चेतना चोरडिया, श्वेता कोठारी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)