खालप येथील लष्करी जवानाचे कर्तव्य बजावत असतांना जम्मू काश्मीर येथे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 07:19 PM2018-09-12T19:19:40+5:302018-09-12T19:20:47+5:30
देवळा : खालप ता.देवळा येथील सैन्य दलातील जवान विजय काशिनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असतांना मंगळवारी ( दि.११ ) रात्री आठ वाजुन तीस मिनिटांनी निधन झाले. जम्मू काश्मीर येथे निकम यांचे मुधवारी (दि. १२) शवविच्छेदन करण्यात आले असून गरुवारी (दि.१३) सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहे.

विजय निकम यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच खालप गाव व परीसरावर शोककळा पसरली. निकम यांच्यावर शुक्र वारी ( दि.१४) रोजी त्यांचे पार्थिव खालप येथे त्यांच्या गावी आणल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची प्राथमिक माहीती तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना, मुलगा ओमकार, सत्यम असा परिवार आहे. विजय निकम यांचे वडील काशिनाथ निकम २००५ तर आई २००६ साली मृत पावले. विजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खालप येथे झाले. २२ फेब्रुवारी २००३ रोजी विजय भारतीय सैन्यदलाच्या सेवेत दाखल झाले. ५७ वायरलेस रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. विजय त्याच्या विनोदी स्वभावामुळे संपूर्ण गावाला परिचित होते. बुधवारी दिवसभर गावातील गावकऱ्यांनी व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत दुखवटा पाळला. प्रशासनातर्फे विजय यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु आहे.