आजपासून रंगणार किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:24 AM2018-09-04T00:24:42+5:302018-09-04T00:25:27+5:30
सर्व नागरिकांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले
नाशिक : सर्व नागरिकांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, एकलहरे अणु विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांना वसुंधरा सन्मान तर वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने आणि पर्यावरण विषय माध्यमातून मांडणाऱ्या पत्रकार शिवानी गणेश यांना वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. नाशिक शहरात दि. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान होणाºया वसुंधरा महोत्सवादरम्यान गुरु वारी (दि. ६) प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. गुरू गोविंदसिंग कॉलेजमध्ये महोत्सवाच्या उद्घाटनानंतर शैलजा देशपांडे यांचे व्याख्यान, मेट महाविद्यालयात फोटो प्रदर्शन, आनंद निकेतन शाळेत चर्चासत्र, व्ही. एन. नाईक मुंडे महाविद्यालयात वर्कशॉप, आयडिया आर्किटेक्चर कॉलेजमध्ये डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांचे वाळूला असलेल्या विविध पर्यायांवरील व्याख्यान, रुंग्टा शाळेत हसत खेळत पर्यावरण उपक्रम, एकलहरे अणुशक्ती वीज प्रकल्पाला भेट असे भरगच्च कार्यक्र म आहेत. किर्लोस्कर समूह आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने देशातील ३० हून अधिक शहरांमध्ये होणारा हा महोत्सव नाशिकमध्ये सलग नवव्या वर्षी होत असून, या महोत्सवाचा विषय ‘प्रदूषण टाळा, नदी वाचवा’ असा असणार आहे. ‘चंगळवाद आणि पर्यावरण’ या विषयावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान होणार आहे.