कोटमगाव : एसएनडी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनकडून परिसर स्वच्छ यात्रेतील स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांनी घेतले हातात झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:33 PM2017-10-01T23:33:25+5:302017-10-02T00:09:14+5:30
तालुक्यातील कोटमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबामातेची यात्रा भरली असून, येथे लाखो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. खाद्यपदार्थांची अनेक दुकाने, हॉटेल येथे लागले असून, परिसरात अस्वच्छता वाढली होती.
येवला : तालुक्यातील कोटमगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबामातेची यात्रा भरली असून, येथे लाखो भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. खाद्यपदार्थांची अनेक दुकाने, हॉटेल येथे लागले असून, परिसरात अस्वच्छता वाढली होती.
विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची जनजागृती केली. ग्रामसेवक सचिन कल्लापुरे, सरपंच नामदेव माळी, सदस्य गणेश लहरे, नवनाथ कोटमे, प्रा. पी. एस. बारवकर, प्रा. एम. एस. देशमुख, प्रा. एस. जी. सावंत, प्रा. एस. एस. दुग्गड आदी उपस्थित होते. प्राचार्य एच. एन. कुदळ, विभागप्रमुख प्रा. व्ही. जी. भामरे यांचे मार्गदर्शन मिळाले. तंत्रनिकेतनच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत स्वच्छता पंधरवडानिमित्त कोटमगाव देवीच्या यात्रेत स्वच्छता मोहीम राबवली. एरवी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे भली मोठी पुस्तके, साहित्य दिसते; मात्र या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता केली. कोटमगाव ग्रामपंचायतीकडून झाडू, टोपल्या घेऊन संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवली. यात प्लॅस्टिक कचरा, केळीची साले, नारळाच्या शेंड्या व इतर असा ट्रकभर कचरा जमा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे या उपक्र मास विके्रत्यांनी प्रतिसाद दिला. दुकानदार, भाविकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फीचा आनंद घेतला. सरपंच नामदेव माळी, ग्रामसेवक सचिन कोल्हापुरे यांनी संतोष जनसेवा मित्रमंडळाचे सर्वेसर्वा कुणाल दराडे, विभागप्रमुख सतीश राजनकर, प्रा. संदीप आसूड, प्रा. गणेश गव्हाणे, प्रा. किरण पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रवीण लहरे आदींनी उपक्र माचे नियोजन केले.