रिक्षाचालकांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ
By admin | Published: November 29, 2015 12:01 AM2015-11-29T00:01:30+5:302015-11-29T00:01:31+5:30
रिक्षाचालकांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ
नाशिक : नाशिक फर्स्ट व महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कमध्ये रिक्षाचालकांसाठी आयोजित वाहन नियमाच्या पालनाचा शुभारंभ वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षाचालकांची महत्त्वाची भूमिका असून, त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे वाघुंडे यावेळी
म्हणाले़
नाशिक महापालिकेच्या भूखंडावर साकारेल्या या चिल्ड्रेन्स पार्क येथे शालेय विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शनिवार आणि रविवारी रिक्षाचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर वाघुंडे यांनी शहरातील सुमारे तेरा लाख वाहनचालकांनी नियम पाळले तर वाहतूक नियमनाचा प्रश्नच उरणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षाचालकांची महत्त्वाची भूमिका असून, त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़
नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांनी रिक्षाचालक, बस व टेम्पोचालकांनाही प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे सांगितले. दर शनिवारी व रविवारी हे प्रशिक्षण दिले जाणार असून, एका प्रशिक्षण कार्यक्रमात ७० जणांना
समावेश करण्यात येणार आहे़
रिक्षाचालकांना प्रशिक्षक श्रीकांत करोडे, प्रतिभा धोपावकर, राजेंद्र कुलकर्णी, साहेबराव खरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मुख्तार बागवान, नाशिक फर्स्टचे देवेंद्र बापट, मिलिंद जांबोटकर, प्रमोद लाड, मुक्तार मनियार, राजेंद्र महाले आदिंसह वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)