जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: March 7, 2017 12:54 AM2017-03-07T00:54:43+5:302017-03-07T00:54:53+5:30
मालेगाव : कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, भत्ते याबाबतचे दायित्व शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष कृती समितीने धरणे आंदोलन छेडले होते
मालेगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या (एमजीपी) कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, भत्ते याबाबतचे दायित्व शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष कृती समितीने येथील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांप्रश्नी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात येथील दोनशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. गेल्या १ मार्चपासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले होते. आज सोमवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
शासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, भत्ते आदिंचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनात संघटनेचे जे. एम. खरे, टी.जी. पिंजन, ओ. एम. अग्रवाल आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)