अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीला ठार मारणाऱ्या प्रियकरासह दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 08:09 PM2018-09-25T20:09:51+5:302018-09-25T20:11:40+5:30

नाशिक : अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी) व त्याचा साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर, पंचवटी) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली़ सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात बारा साक्षीदार तपासले़

 The life imprisonment of both of them, including the beloved girl who killed her husband in connection with immoral relations | अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीला ठार मारणाऱ्या प्रियकरासह दोघांना जन्मठेप

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीला ठार मारणाऱ्या प्रियकरासह दोघांना जन्मठेप

Next
ठळक मुद्देपेठरोडवरील घटना : खून करून पाण्याच्या टाकीत मृतदेहाची विल्हेवाट

नाशिक : अनैतिक संबंधातून प्रेयसीचा पती दशरथ ठमके यास मद्य पिण्याच्या बहाण्याने नेऊन धारदार शस्त्राने वार करून ठार मारणारा प्रियकर गणेश वसंत गरड (२२, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी) व त्याचा साथीदार सुनील रामदास अहिरे (२९, रा़ फुलेनगर, पंचवटी) या दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़गिमेकर यांनी मंगळवारी (दि़२५) जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली़ सरकारी वकील रविंद्र निकम यांनी या खटल्यात बारा साक्षीदार तपासले़

पेठरोडवरील गजानन चौकातील रहिवासी दशरथ बाळू ठमके याच्या पत्नीचे आरोपी गणेश गरड सोबत प्रेमसंबंध होते़ याची माहिती ठमके यास मिळाल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले होते़ त्यावेळी ठमके याने गरड यास माझ्या पत्नीचा नाद सोडून दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही गरड यास दिली होती़ या गोष्टीचा राग गरड याच्या मनात असल्याने २१ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दशरथ ठमके यास दारू पाजण्याच्या बहाण्याने पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड येथील पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेला़ आरोपी गरड सोबत सुनील रामदास अहिरे, राहुल उर्फ भुºया भिमा लिलके (१९, रा़ एरंडवाडी, म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (२४, रा़ कालिकानगर, पंचवटी) व सुशील उर्फ श्याम मधुकर बागूल (३१, रा़ गजानन चौक, दिंडोरी रोड) हे साथीदार देखील होते़

ठमके यास दारु पाजल्यानंतर आरोपी गरड व त्याच्या साथिदारांनी चॉपरने छातीवर, गळ्यावर व पोटावर वार करून ठार मारले़ यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मयत ठमकेच्या पायाला दोरी बांधून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकला़ २१ तारखेपासून घरातून गेलेला भाऊ घरी न परतल्याने २३ आॅक्टोबरला भाऊ संतोष ठमके याने पंचवटी पोलीस ठाण्यात दशरथ ठमके हा बेपत्ता असल्याची तक्रार केली होती़ तसेच २१ तारखेला गरडसोबत गेल्याची माहिती पोलिसांनी दिली होती़ त्यानुसार पंचवटीचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व पोलीस उपनिरीक्षक योगेशउबाळे यांनी २७ आॅक्टोबरला आरोपी गरडला ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला, त्याने मृतदेह पाण्याचा टाकीत टाकल्याची माहिती दिली़ त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेह आढळून आला होता़

जन्मठेप आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंड
सरकारी वकिल रविंद्र निकम यांनी केलेला युक्तीवाद तसेच परिस्थ्लिृतीजन्य पुरावे व तपासलेले बारा साक्षीदार याआधारे दोघांनी दशरथ ठमकेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. न्यायाधीश गिमेकर यांनी आरोपी गरड व अहिरे या दोघांनाही जन्मठेप आणि प्रत्येकी ३० हजार रुपये दंड ठोठावला. गुन्हा शाबित होण्यासाठी पैरवी अधिकारी पोलीस नाईक एस. एल. जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. शिंदे, पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी प्रयत्न केले़

Web Title:  The life imprisonment of both of them, including the beloved girl who killed her husband in connection with immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.