‘लोकमत’ सरपंच अवॉर्डस् : नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार सरपंचांचा बुधवारी शानदार सोहळ्यात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 03:56 PM2018-01-16T15:56:28+5:302018-01-16T15:59:35+5:30
जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्राम संरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजीटल अवॉर्ड), पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मूख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या श्रेणीमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नाशिक : गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणा-या व त्या स्वप्नांना मुर्त रुप देण्यासाठी झटणाºया कर्तबगार सरपंचाच्या कार्याची दखल घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लोकमत सरपंच अवॉर्डस् चे वितरण उद्या बुधवारी (दि.१७) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात करण्यात येणार आहे.
बीकेटी प्रस्तुत तसेच पंतजली प्रायोजित व महिन्द्रा ट्रॅक्टर्स सहप्रायोजक असलेल्या या लोकमत सरपंच अवॉर्डस वितरण सोहळ्यास राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भूसे, विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे व पोलीस अधिक्षक संजय दराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये सकाळी अकरा वाजता होणा-या या कर्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक व राष्टपती पुरस्कार विजेते औरंगाबाद जिल्ह्यातील भास्करदादा पेरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, ग्राम संरक्षण, आरोग्य, कृषी तंत्रज्ञान, ई-प्रशासन (डिजीटल अवॉर्ड), पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्मिती, उद्योन्मूख नेतृत्व, सरपंच आॅफ द इयर या श्रेणीमध्ये सरपंचांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
‘लोकमत’ नेहमीच प्रयत्नपूर्वक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्र म राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने राज्य विधिमंडळापासून ते देशाचे सर्वोच्च कायदे मंडळ -संसदीय सदस्यांचा गौरव केला आहे. तळागाळातील व्यक्तींच्या आदर्श कार्याला ओळखून लोकशाहीला बळकटी देण्यासाठीच ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ उपक्र म हाती घेण्यात आला आहे. आपले गाव हाच आपला अभिमान आहे आणि इथेच आमची लोकशाही मूल्ये सर्वात महत्त्वाची असली पाहिजेत. जय हिंद!
-विजय दर्डा, चेअरमन, संपादकीय मंडळ, लोकमत समूह
असे होते परिक्षक मंडळ
परिक्षक मंडळामध्ये माजी मंत्री, वनाधिपती विनायकदादा पाटील, कृषीतज्ज्ञ डॉ. गिरीधर पाटील, वीजमंडळाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता अरविंद गडाख, प्रगती अभियानच्या संचालिका सौ. आश्विनी कुलकर्णी, जलचिंतनचे राजेंद्र जाधव, जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व पाणी बचाव चळवळीतील निशिकांत पगारे यांचा समावेश होता.
बारकोडद्वारे निवड
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अवलंबिल्या जाणा-या बारकोड पध्दतीने नाशिक जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली. त्यामुळे निवड झालेल्या सरपंचांची व त्यांच्या ग्रामपंचायतींची नावे समोर न येता तटस्थ व पारदर्शकपणे निवड प्रक्रिया पार पडली. या निवडप्रक्रियेअंतर्गत १३ श्रेणीतील कार्यकुशल सरपंचांची निवड करण्यात आली आहे.