पांगरीकरांचे ठिय्या आंदोलन स्थगित मराठा क्रांती मोर्चा : समन्वयकांसह नायब तहसीलदारांची मध्यस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:54 PM2018-08-11T18:54:42+5:302018-08-11T18:55:01+5:30
सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.
सिन्नर : गेल्या सहा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तालुक्यातील पांगरी येथे सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास नाशिक व सिन्नर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट दिल्यानंतर नायब तहसीलदारांसोबत झालेल्या चर्चेतून पांगरीकरांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्यासह सकल मराठा समाजाच्या पांगरी येथील बांधवांनी संत हरिबाबा मंदिराच्या प्रांगणात सोमवारपासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला होता. या आंदोलनास सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावून पाठींबा दिला होता. शांततेच्या मार्गाने सुरु केलेल्या या ठिय्या आंदोलनात दररोज शाहीरांचे पोवाडे व कार्यक्रम होत होते.
मराठा समाजाच्या नाशिक येथील ठिय्या आंदोलनाला दगडफेकीचे गालबोट लागल्यानंतर राज्य समन्वय समितीचा पुढील निर्णय होईपर्यंत जिल्'ातील आंदोलनांना स्थगिती देण्यात आली होती. तथापि, पांगरी येथे गेल्या सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु होते. जिल्'ातील मराठा क्रांती मोर्चाने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी पांगरीकरांसोबत संवाद साधला होता. या पार्श्वभूमीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक येथील समन्वयक गणेश कदम, करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, सिन्नर येथील शरद शिंदे, डी. डी. गोर्डे यांनी ठिय्या मोर्चाला बसलेले विलास पांगारकर यांच्यासह मराठा समाज बांधवांची भेट घेतली. नाशिक जिल्'ातील आंदोलन तात्पुरते स्थगित झाल्याचे सांगून आपणही आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे देवून आंदोलनाची सांगता करावी अशी विनंती करण्यात आली.
मराठा आंदोलनाची इतक्या दिवस गांभीर्याने दखल न घेतल्याने त्याचे रुपांतर ठोक मोर्चात झाले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मराठा समाजाचा असंतोष ठोक मोर्चातून दिसून आला. मात्र आंदोलन चुकीच्या मार्गाला गेले तर त्याचा त्रास पुढच्या पिढीला होईल. आंदोलन विधायक मार्गाने जावे. आत्महत्त्या व जाळपोळ होऊ नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे कोकाटे म्हणाले. समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्वांनी शांततेच्या मार्गान जावे असा सल्लाही कोकाटे यांनी दिला. त्यानंतर विलास पांगारकर यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा केली.