कर्जाची परतफेड न करता फायनान्सची लाखोंची फसवणूक
By admin | Published: April 7, 2017 06:11 PM2017-04-07T18:11:34+5:302017-04-07T18:11:34+5:30
कर्जाची परतफेड न करता फायनान्सची लाखोंची फसवणूक
नाशिक : फायनान्सकडून फ्लॅटवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता त्याच फ्लॅटचा खोटा विक्री व्यवहार केल्याचे दाखवून पुन्हा तो फ्लॅट त्याच फायनान्स कंपनीला तारण देत पुन्हा अधिक कर्ज घेऊन ते न फेडता ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पाथर्डी फाटा परिसरातील गोविंदनगरमध्ये घडला आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्यात श्रीराम फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक संदीप भास्कर घुगे (३२, गोविंद पार्क अपार्टमेंट, वासननगर, पाथर्डी फाटा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित निरंजन शिवाजी ठाकरे, शोभा ठाकरे, बालाजी व्यंकटरणम अय्यर व ज्ञानेश अवचट (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये श्रीराम फायनान्स कंपनीकडून फ्लॅटसाठी कर्ज घेतले़ या कर्जाची परतफेड न करता संशयितांनी आपसात संगनमत करून फ्लॅटच्या खोटा विक्रीचा व्यवहार केला व पुन्हा हा विक्री केलेला फ्लॅट श्रीराम फायनान्स कंपनीलाच तारण देत पुन्हा ९० लाख रुपयांचे कर्ज घेतले़ यानंतर कर्जाची परतफेड न करता कंपनीचा विश्वासघात केला़