गॅस सिलिंडर दरवाढी विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:51 AM2017-11-04T00:51:15+5:302017-11-04T00:51:21+5:30
गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडरमध्ये साधारणत: सव्वादोनशे रुपयांची दरवाढ झाली असून, दि. १ नोव्हेंबरपासून जवळपास ९५ रुपयांहून अधिक दरवाढ झाली. त्याविरोधात कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना कळवणच्या नगराध्यक्षा सुनीता पगार यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी तालुकाध्यक्ष अलका कनोज, नगरसेवक अनिता जैन, अनुराधा पगार यांनी निवेदन दिले.
कळवण : गेल्या महिनाभरात गॅस सिलिंडरमध्ये साधारणत: सव्वादोनशे रुपयांची दरवाढ झाली असून, दि. १ नोव्हेंबरपासून जवळपास ९५ रुपयांहून अधिक दरवाढ झाली. त्याविरोधात कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना कळवणच्या नगराध्यक्षा सुनीता पगार यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी तालुकाध्यक्ष अलका कनोज, नगरसेवक अनिता जैन, अनुराधा पगार यांनी निवेदन दिले.
यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, रायुकॉँचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाचपिंड, पिंटू भामरे, भाऊसाहेब पवार सहभागी झाले होते. गॅस सिलिंडर दैनंदिन गरज असून, ग्रामीण भागात गॅसधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या अवाजवी किमतीत वाढ झाल्यावरही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर यात किरकोळ कपात करण्यात येऊन पुन्हा दरवाढ करत जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली. सदरची दरवाढ त्वरित रद्द करून गॅस सिलिंडरची किंमत पूर्ववत करून दरवाढ नियंत्रणात आणावी. ला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .
क्कद्धशह्लश ष्ड्डश्चह्लड्डद्बठ्ठ