महापालिका : सहाही विभागांत २४ तास नियंत्रण कक्ष आपत्ती व्यवस्थापन आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:36 AM2018-06-01T01:36:05+5:302018-06-01T01:36:05+5:30

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवले जाणार आहेत.

Municipal Corporation: 24 Hour Control Room Disaster Management Plan in Six Sections | महापालिका : सहाही विभागांत २४ तास नियंत्रण कक्ष आपत्ती व्यवस्थापन आराखडा

महापालिका : सहाही विभागांत २४ तास नियंत्रण कक्ष आपत्ती व्यवस्थापन आराखडा

Next
ठळक मुद्देनदीपात्रालगत ५० जीवरक्षक नियुक्त केले जाणार आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला

नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरू ठेवले जाणार आहेत. दरम्यान, पूरस्थितीच्या वेळी नदीपात्रालगत ५० जीवरक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
केरळ किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शहरात वेळेत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात उद्भवणारी पूरस्थिती आणि अन्य आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. शहरात विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचणाऱ्या ४९३ ठिकाणांची यादी तयार करून बांधकाम विभागामार्फत उपाययोजना करण्यात आल्या असून, पावसाळापूर्व नालेसफाईची ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, मनपा क्षेत्रातील नदीकाठच्या पूरबाधित झोपडपट्ट्यांची यादी तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयांमार्फत पूरपरिस्थितीकाळात या भागाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
पूराची माहिती नागरिकांपर्यंत लवकर पोहोचावी यासाठी एसएमएसच्या माध्यमातून तसेच ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून पूर्वसूचना दिली जाणार आहे. आपत्ती नियंत्रणासाठी पूरपरिस्थिती काळाकरिता दोन शोध व बचाव पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडील रबर बोट, फायबर बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, क ॉक्र ीट कटिंग मशीन, कॉम्बी रेस्क्यू टूल्स, टॉर्चेस, दोन अत्याधुनिक रेस्क्यू व्हॅन आदी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आठ फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहेत. मनपाच्या चारही तरण तलावांवरील जीवरक्षकांबरोबरच पंचवटी, रामकुंड, आनंदवल्ली या भागातील निष्णात पोहणाºयांची माहितीही संकलित करण्यात आली असून पूरपरिस्थितीच्या वेळी ५० जीवरक्षक तैनात केले जाणार आहेत.

Web Title: Municipal Corporation: 24 Hour Control Room Disaster Management Plan in Six Sections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.