नाशिक महापालिका पाच नगरसेवकांवरील अपात्रतेचे गंडांतर टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 07:45 PM2017-08-22T19:45:03+5:302017-08-22T19:47:21+5:30

जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती.

Nashik municipal corporation disrupted the collapse of five corporators | नाशिक महापालिका पाच नगरसेवकांवरील अपात्रतेचे गंडांतर टळले

नाशिक महापालिका पाच नगरसेवकांवरील अपात्रतेचे गंडांतर टळले

googlenewsNext
ठळक मुद्देजात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादरअपात्रतेचे गंडांतर टळले दोन भाजपा तर राष्टÑवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षामधील प्रत्येकी एक नगरसेवकाचा समावेश दि. २३ फेबु्रवारीला मतमोजणी झाली होती

नाशिक - महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होण्यास बुधवारी (दि.२३) सहा महिने पूर्ण होत आहेत. महापालिकेवर आरक्षित जागांवरून निवडून गेलेल्या पाच नगरसेवकांनी त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती. मात्र, पाचही नगरसेवकांनी मुदत पूर्ण होण्यास काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असताना जातपडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर केल्याने त्यांच्यावरील अपात्रतेचे गंडांतर टळले आहे. या पाच नगरसेवकांमध्ये दोन भाजपा तर राष्टÑवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षामधील प्रत्येकी एक नगरसेवकाचा समावेश आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २१ फेबु्रवारी २०१७ रोजी मतदान होऊन दि. २३ फेबु्रवारीला मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत प्रभाग २ (क) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटात भाजपाचे उद्धव निमसे, प्रभाग २३ (ब) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात भाजपाच्या शाहीन मिर्झा सलीम बेग, प्रभाग १४ (ब) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादीच्या समीना शोएब मेमन, प्रभाग क्रमांक ११ (ब) मधून अनुसूचित जमाती गटात मनसेचे योगेश किरण शेवर तर प्रभाग २२ (ब) मधून शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटात निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. या पाचही नगरसेवकांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते

Web Title: Nashik municipal corporation disrupted the collapse of five corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.