अखेर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतींना मिळाले वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 07:50 PM2018-08-01T19:50:16+5:302018-08-01T19:54:41+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिले. गेल्या जानेवारीपासून खोसकर यांनी कालबाह्य झालेली अॅम्बेसेडर कार जिल्हा परिषदेला परत करून नव्या वाहनाची मागणी केली होती. यासाठी त्यांना आठ महिने प्रतीक्षा करावी लागली.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अर्पणा खोसकर यांना अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिले. गेल्या जानेवारीपासून खोसकर यांनी कालबाह्य झालेली अॅम्बेसेडर कार जिल्हा परिषदेला परत करून नव्या वाहनाची मागणी केली होती. यासाठी त्यांना आठ महिने प्रतीक्षा करावी लागली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांना बारा वर्ष जूने आणि दोन ते अडीच लाख किलोमीटर चालविण्यात आलेली अॅम्बेसेडर कार देण्यात आली होती. सभापती दौऱ्यावर असतांना अनेकदा रस्त्यातच कार बंद पडण्याच्या घटना घडल्याने खोसकर यांनी जिल्हा परिषद प्रशानाला याबाबत माहिती देऊन नवी गाडीची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यांच्यासाठी आलेले वाहन अन्य विभागाला देण्यात आल्यामुळे तर त्यांनी गेल्या जानेवारीतच जिल्हा परिषदेत अॅम्बेसॅडर कार उभी करून ठेवली होती. तेंव्हा पासून त्या खासगी वाहनाचाच वापर करीत होत्या. तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी नवीकोरी गाडी मिळाली असून त्यांनी या गाडीच्या चाव्या स्विकारल्या.
गत पंचवार्षिेक मध्ये महिला बालकल्याण सभापती राहिलोल्या डोखळे यांना तर अडीच वर्ष वाहनाचा लाभच मिळाला नव्हता. तर खोसकर यांना जुनी गाडी परत केल्यानंतर आठ महिन्यांनी नवीन गाडी प्राप्त झाली आहे. अन्य सभपातींना वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असतांना खोसकर यांना मात्र बारावर्ष जूने वाहन देण्यात आल्यामुळे त्यांनी तेंव्हाच नाराजी दर्शविली होती. देण्यात आलेले अतिशय जूने वाहनही बंदू पडू लागल्याने खोसकर यांनी जिल्हा परिषदेला दणका दाखविल्यानंतर प्रशासनाकडे चर्चा होऊन त्यांनी वाहनाची विनंती मान्य केली आणि त्यांना मंगळवारी (दि.१) रोजी वाहन ताब्यात देण्यात आले.