कचरा विलगीकरणासाठी घंटागाड्यांचे नवीन डिझाइन

By admin | Published: May 21, 2017 01:04 AM2017-05-21T01:04:28+5:302017-05-21T01:04:43+5:30

नाशिक : महापालिकेने १ एप्रिलपासून शहरात ओला व सुका कचरा विलगीकरणास सुरुवात केली आहे

New design for garbage collection | कचरा विलगीकरणासाठी घंटागाड्यांचे नवीन डिझाइन

कचरा विलगीकरणासाठी घंटागाड्यांचे नवीन डिझाइन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेने १ एप्रिलपासून शहरात ओला व सुका कचरा विलगीकरणास सुरुवात केली असली तरी घंटागाड्यांमध्ये त्याबाबतची प्रमाणित व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणासाठी नवीन डिझाइन तयार केले असून, आयुक्तांनीही त्यास पसंती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.२२) आयुक्तांनी त्याच्या अंमलबजावणीकरिता घंटागाडी ठेकेदारांची बैठक बोलाविली आहे.
महापालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार, शहरात घनकचरा विलगीकरणाची अंमलबजावणी सुरू केली असली तरी ती कागदोपत्रीच दिसून येत आहे. अद्यापही घंटागाडी ठेकेदारांकडून कचरा विलगीकरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी कंपार्टमेंट करणे आवश्यक आहे. ठेकेदारांनी कंपार्टमेंटची व्यवस्था केली असली तरी ती प्रमाणित नाही. घनकचरा संकलनात बव्हंशी कचरा हा ओल्या स्वरूपात जमा होत असतो. परंतु, घंटागाड्यांमध्ये ओल्यासाठी २० टक्के तर सुक्यासाठी ८० टक्के असे कचऱ्याचे प्रमाण दाखविले आहे. शिवाय, गाडीच्या मध्ये सरळ दोन भागात कंपार्टमेंट न करता ते आडव्या पद्धतीने करण्यात आले आहे.

Web Title: New design for garbage collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.