मुंबईपासून ‘ओखी’ ६७० कि.मीवर : नाशिकच्या किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर; ‘ओखी’ वादळाचा परिणाम

By azhar.sheikh | Published: December 4, 2017 02:37 PM2017-12-04T14:37:52+5:302017-12-04T16:22:49+5:30

पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे.

 'Oki' from Mumbai 670 km: The minimum temperature in Nashik is 16.1 degrees; The result of the 'Oki' storm | मुंबईपासून ‘ओखी’ ६७० कि.मीवर : नाशिकच्या किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर; ‘ओखी’ वादळाचा परिणाम

मुंबईपासून ‘ओखी’ ६७० कि.मीवर : नाशिकच्या किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर; ‘ओखी’ वादळाचा परिणाम

Next
ठळक मुद्देओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटरओखी वादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे निरिक्षण पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान

नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे वेगाने वाढत असल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे; मात्र ढगाळ हवामान झाल्यामुळे दिनकराचे दर्शनही याबरोबर दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशापर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर पोहचला आहे. मागील दोन दिवसांमध्ये सहा अंशाने ही वाढ झाल्याचे निरिक्षण हवामान खात्याच्या निरिक्षण केंद्राने नोंदविले. ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर असून वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे म्हणणे आहे. यामुळे पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो
ढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपुर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गाने आपले रुप बदलले असून दोन दिवसांपासून कमालीचे ढग दाटत असल्याने हवामानात आर्द्रता वाढू लागल्याने किमान तपमानात वाढ होत आहे.


भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ वादळाचे थैमानाने ३५ बळी घेतले आहेत. ताशी १३० कि. मी वेगाने हे वादळ लक्षद्वीपवर आदळले. तामिळनाडू, केरळ या राज्यांना ‘ओखी’ ने जबर तडाखा दिला असून पुढे हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Web Title:  'Oki' from Mumbai 670 km: The minimum temperature in Nashik is 16.1 degrees; The result of the 'Oki' storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.