कांदा भाव खाणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 05:58 PM2018-10-14T17:58:34+5:302018-10-14T17:59:15+5:30
येवला : कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रु पयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून भावात वाढ होत असल्याचे चित्र बळीराजाच्या दृष्टीने आनंददायी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. शिवाय येवला कृषी उत्पन्न बाजार आवारात शनिवारी कांद्याला १४७० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.
येवला : कांद्याच्या दरात सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते ७०० रु पयांनी वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून भावात वाढ होत असल्याचे चित्र बळीराजाच्या दृष्टीने आनंददायी आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे. शिवाय येवला कृषी उत्पन्न बाजार आवारात शनिवारी कांद्याला १४७० रु पये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.
वर्षभरापासून कांद्याला एक हजार रु पयांचा टप्पा गाठण्यासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. काही वर्षांचा अनुभव पाहता उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळतो. पण गेल्यावर्षी राज्यात विक्र मी कांद्याचे उत्पादन झाले होते. त्यामुळे भाव कोसळले होते. तेव्हापासून कांद्याची घाऊक बाजारपेठ अनिश्चिचततेच्या भोवºयात अडकली होती. मागील हंगामात कांद्याला जेमतेम दर मिळत होता. यावर्षी उन्हाळी कांद्याची आवक साधारपणे मे पासून सुरू झाली. यासाठी प्रति क्विंटलचे भाव पाचशे ते साडेपाचशे रु पये होता. राज्यापाठोपाठ मध्यप्रदेशात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी दर कोसळल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून इतर राज्यात उन्हाळ कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे मध्यप्रदेशातील कांदा लवकर संपला. आता केवळ महाराष्ट्रातील शेतकºयांकडे कांदा शिल्लक आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत कांदा भाव खाणार आणि शेतकºयाला दोन पैसे मिळणार असल्याची स्थिती निर्माण होण्याची अशा आहे.
कांद्याला मे आणि जून महिन्यात मागणी असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर कांद्याची मागणी कमी होते. तसेच पावसाळी हवामानाचा त्या कांद्यावर परिणाम होऊ नये, यासाठी शेतकरी चाळीत कांदा ठेवतात. यंदा मध्यप्रदेशातही कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून देशातील इतर राज्यांत कांद्याची मागणी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. ६ आॅक्टोबर २०१८ पर्यंत कांद्याला ६०० रु पये प्रतीक्विंटल चा भाव मिळत होता. मात्र या आठवड्यापासून कांदादर वाढत असल्याचे चित्र आहे. कांद्याने १४७० रु पयाचा टप्पा गाठल्याने आता टप्याटप्याने मर्यादित तेजी येईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
अनियमित व अत्यल्प पावसामुळे महाराष्ट्रात खरिपाची लागवड कमी झाली आहे. उन्हाळ कांदा संपल्यावर लाल कांद्याला चांगला भाव मिळू शकतो, त्यानुसार शेतकºयांनी मागणी अन पुरवठ्याचे गणित समजून घेण्याची आवश्यकता आहे.
चीनमध्ये पाऊस झाला आहे. तसेच कर्नाटकमधील बंगळुरु रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाºया कांद्याच्याही काढणीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा येत्या काळात भाव खाणार आहे. तसेच दुसरीकडे ऐन पावसाळयात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पोळ (खरीप) कांद्याची लागवड रखडली आहे.
श्रावणातील किमान पावसावर उभारी मिळालेल्या शेतकºयांना कांदा लागवड केली आहे. उन्हाळ कांदा नोव्हेंबरपर्यंत संपत येईल, अशा काळात पोळ कांदा बाजारात येण्यास सुरु वात होईल. आणि पर्यायाने या कांद्याखेरीज ग्राहकांकडे दुसºया कांद्याचा पर्याय राहणार नाही. गेल्या सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आदी राज्यात व पाकिस्तानची सीमा कांदा निर्यातीसाठी बंद असली तरी अन्यत्र परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापुर याठिकाणी मागणी चांगली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. इतर राज्यांतून मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या ८ दिवसापासून कांदादरात दररोज सुधारणा होत आहे. ही शेतकºयांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.
नंदूशेठ अट्टल
कांदा व्यापारी,येवला.