पाळीव प्राणी अडकतात ‘ग्लू ट्रॅप’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:11 AM2017-11-07T00:11:40+5:302017-11-07T00:11:47+5:30

घरात घुसून उपद्रव करणाºया उंदीर, घुशी, चिचुंद्री, पाल यांसारख्या प्राण्यांना पकडण्यासाठी वापरल्या जाणाºया ‘ग्लू ट्रॅप’मध्ये पाळीव प्राणी, साप यासारखे प्राणीच मोठ्या प्रमाणात अडकत असून, लहान मुलांसाठी हे ट्रॅप धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. या ट्रॅपचा अतिरेकी वापर थांबवावा, ट्रॅप निर्मात्यांनी त्यातील ग्लूचे प्रमाण कमी करावे, लहान मुले असणाºया घरात हा ट्रॅप वापरताना सावधानता बाळगावी, अशी सूचना प्राणिमित्र संघटनेकडून देºयात आली आहे.

 Pets get caught in the trap of 'glue trap' | पाळीव प्राणी अडकतात ‘ग्लू ट्रॅप’च्या जाळ्यात

पाळीव प्राणी अडकतात ‘ग्लू ट्रॅप’च्या जाळ्यात

googlenewsNext

भाग्यश्री मुळे ।
नाशिक : घरात घुसून उपद्रव करणाºया उंदीर, घुशी, चिचुंद्री, पाल यांसारख्या प्राण्यांना पकडण्यासाठी वापरल्या जाणाºया ‘ग्लू ट्रॅप’मध्ये पाळीव प्राणी, साप यासारखे प्राणीच मोठ्या प्रमाणात अडकत असून, लहान मुलांसाठी हे ट्रॅप धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. या ट्रॅपचा अतिरेकी वापर थांबवावा, ट्रॅप निर्मात्यांनी त्यातील ग्लूचे प्रमाण कमी करावे, लहान मुले असणाºया घरात हा ट्रॅप वापरताना सावधानता बाळगावी, अशी सूचना प्राणिमित्र संघटनेकडून देºयात आली आहे.  सामान्यत: घरामध्ये उंदीर, घुशी आणि पाल यासारख्या प्राण्यांचा उपद्रव होत असतो. त्यावर मात करण्यासाठी अनेक औषधे असले तरी विषारी औषध असलेले केक खाऊन हे प्राणी कोठेही येऊन पडतात. त्यावर मात म्हणून ग्लू ट्रॅपसारखा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. अशा प्रकारच्या ट्रॅपमधून उंदीर-घुशीसारखे पाणी अडकत असले, तरी निरुपयोगी किंवा घराच्या बाहेर ठेवलेल्या या ट्रॅपमध्ये अन्य प्राणीही अडकत आहेत.  या ट्रॅपमुळे प्राण्यांची त्वचा, केस, पिसे यांना इजा होत असून, ट्रॅपमधून सुटका करून घेण्यासाठी हे प्राणी स्वत:ला ओढत असताना त्वचा ताणली जाऊन वेदना व जखमाही होत आहेत. बरेचसे प्राणी चिकटलेले अंग सोडवून घेण्यासाठी पाय चाटत आहेत. काही प्राणी झटापटीत तोंड ग्लूमध्ये घुसवून टाकत असून, त्यामुळे त्यांना श्वास घेणेही कठीण होत आहे. दीर्घकाळ असेच अडकून पडल्याने अनेकांचा मृत्यूही ओढवत आहे. या अडकलेल्या आणि वेदनेने तळमळणाºया, प्रसंगी मृत्युमुखी पडलेल्या पाळीव प्राण्यांची पॅडसह विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्न त्या घरातील सदस्यांसमोर उभा ठाकत आहे.  ग्लू ट्रॅपचे निर्माते प्राणी चिकटताच हे पॅड तसेच फेकून देण्याच्या सूचना पॅकिंगवर करत असल्याने त्या सूचनेनुसार फेकून देण्यात आलेल्या पॅडवर चिकटलेले प्राणी भूक, जखमा, वेदनांसह दीर्घकाळ कचºयात पडून राहत असल्याने अखेरीस त्यांचा मृत्यू होत आहे. हे ग्लू पॅड बनवणाºया कंपन्या स्वैराचार करत असून, त्याचा फटका निरपराध प्राण्यांना बसत आहे. अशा प्रकारे प्राण्यांची हत्या करणे म्हणजे निसर्गचक्रात हस्तक्षेप करण्यासारखे होत असून, या मृत प्राण्यांचे अवशेष मातीतून अन्नसाखळीत येत असल्याने त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम पाहायला मिळत आहे. प्रशासनाने यात लक्ष घालत नियमावली बनवावी, अशी मागणी प्राणिमित्र संघटनांकडून करण्यात येत आहे. 
बिनविषारी साप अडकला ट्रॅपवर 
तीन आठवड्यांपूर्वी गंगापूररोडवरील एका घरात उंदरांसाठी ठेवण्यात आलेल्या ग्लू ट्रॅपवर बिनविषारी साप अडकला. प्राणिमित्र संघटनेला कळविल्यावर त्यांच्या सदस्यांनी तेथे धाव घेत सापाची अथक प्रयत्नांनंतर सुटका केली. ठिकठिकाणी या ट्रॅपमध्ये उंदराऐवजी घरातील पाळीव मांजर, कुत्र्यांची पिल्ले, साप, माश्या, चिलटे, पाल, खारुताई, चिमण्या, पक्षी पॅडवर ठेवलेल्या अन्नाच्या लोभाने येऊन ग्लूमध्ये चिटकत आहेत. ग्लूच्या अतिचिकटपणामुळे या प्राण्यांची सुटका करणे बºयाचदा अवघड होत आहे. 
या ग्लू ट्रॅपवर उंदराऐवजी पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणात चिकटत आहेत. अशा प्राण्यांची सुटका करण्यासाठी नागरिकांचे फोन येतात. घरातील अन्नधान्याची, कपड्यांची, वस्तूंची नासधूस करणाºया उंदरासारख्या उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी या ट्रॅपचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. या ट्रॅपवरील ग्लूची तीव्रता अतिप्रमाणात आहे. कंपन्यांनी ते प्रमाण कमी करायला हवे. लहान मुले असणाºया घरात तर हे ट्रॅप त्यांच्या नजरेस पडणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
- गौरव क्षत्रिय, प्राणिमित्र
उंदीर, घुशींसारखे प्राणी विषारी गोळ्या वगैरे दिल्या तरी कुठेही जाऊन मृत होतात तसेच त्याची दुर्गंधी सुटत असल्याने ग्लू ट्रॅप नागरिकांना सोयीचे वाटते. घरगुती वापराबरोबरच वाहनांमध्येही या ट्रॅपचा वापर वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या वायरींचे संरक्षण होते. ग्राहकांना आम्ही ट्रॅपचा वापर रात्रीच्या वेळीच करा, घरातील पाळीव प्राणी, लहान मुले यांपासून दूर ठेवा, अधूनमधून त्याचे निरीक्षण करत राहा या सूचना आवर्जून करतो.  - तुषार नेमाडे, विक्रेता
ग्लू ट्रॅप वापरताना ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याबाबत आवर्जून सूचना देतो. उंदीर येतील अशाच ठिकाणी, कोपºयांमध्ये ठेवा, असेही सांगतो.  - दीपक पाटील, विक्रेता

Web Title:  Pets get caught in the trap of 'glue trap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.