महापालिका हद्दीतील प्रभाग ३० मधील ९० टक्के परिसर सीसीटीव्हीच्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:35 AM2017-12-18T00:35:00+5:302017-12-18T00:35:50+5:30
महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३० चा सुमारे ९० टक्के भाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे.
इंदिरानगर : महापालिका हद्दीतील एकूण प्रभागांपैकी इंदिरानगर भागातील प्रभाग ३० चा सुमारे ९० टक्के भाग सीसीटीव्हीच्या नजरेखाली आला आहे. या प्रभागातील बहुतेक चौकांमध्ये भाजपप्रणीत युनिक ग्रुपच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने एकूण २६ कॅमेºयांची प्रभागातील हालचालीवर सूक्ष्म नजर असणार आहे.
राजीवनगर टाऊनशिप परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयाचे उद्घाटन उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. राजीवनगर टाऊनशिप परिसरात सुमारे वीस ते पंचवीस अपार्टमेंट असून, त्यामध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहेत. राजीवनगर टाऊनशिप आणि राजीवनगर झोपडपट्टीलगत असल्याने या झोपडपट्टीतील होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी संरक्षण भिंत बांधली होती. परंतु काही दिवसांनी झोपडीमधील टवाळखोरांनी संरक्षक भिंतीस भगदाड पाडून राजीवनगर टाऊनशिपमध्ये ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग तयार केला. सदर मार्गावरून व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस वाढतच चालला होता. परिसरातील त्रस्त नागरिकांनी होणाºया त्रासाची तक्र ार नगरसेवक सतीश सोनवणे यांच्याकडे केली असता त्यांनी तातडीने स्वखर्चाने परिसरात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले त्यामुळे परिसरातील हालचालींवर नजर ठेवण्यास आणि गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी व्यासपीठावर प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये, गुरु नाथ नायडू उपस्थित होते.