गुलाबी थंडीचा कडाका वाढला उबदार कपडे : मैदानांवर व्यायाम करणाºयांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:03 AM2017-12-04T00:03:54+5:302017-12-04T00:10:32+5:30

मालेगाव कॅम्प : मालेगावी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. परंतु सध्या दिवसभर थंडीचा अनुभव येत आहे. यामुळे थंडीचा फायदा घेत व्यायामपटूंची मैदानांवर व्यायाम करण्यासाठी गर्दी होत आहे. मैदानांवर गर्दी वाढत आहे. या थंडीचा बचाव करण्यासाठी नागरिक आपले स्वेटर, जर्किनसह इतर गरम कपडे घालून बोचºया थंडीचा आनंद घेत आहेत.

Pink cold climbs up; warm clothes: crowds exercising on grounds | गुलाबी थंडीचा कडाका वाढला उबदार कपडे : मैदानांवर व्यायाम करणाºयांची गर्दी

गुलाबी थंडीचा कडाका वाढला उबदार कपडे : मैदानांवर व्यायाम करणाºयांची गर्दी

Next
ठळक मुद्देगुलाबी थंडीचा कडाका वाढलाउबदार कपडे : मैदानांवर व्यायाम करणाºयांची गर्दी

मालेगाव कॅम्प : मालेगावी थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर वाढत होता. परंतु सध्या दिवसभर थंडीचा अनुभव येत आहे. यामुळे थंडीचा फायदा घेत व्यायामपटूंची मैदानांवर व्यायाम करण्यासाठी गर्दी होत आहे. मैदानांवर गर्दी वाढत आहे. या थंडीचा बचाव करण्यासाठी नागरिक आपले स्वेटर, जर्किनसह इतर गरम कपडे घालून बोचºया थंडीचा आनंद घेत आहेत.
शहर परिसरात गेल्या महिन्यात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यातच ढगाळी वातावरण व तुरळक पाऊस सर्वांना चिंता लावून गेला होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस थंडीचे आगमन होते. परंतु शहरात याचा मागमूस दिसून आला नाही. आता खºया अर्थाने गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे.थंडीचा पारा ११ अंशावर नाशिक : शहराच्या किमान तपमानाचा पारा गेल्या आठवडाभरात सातत्याने घसरल्यानंतर सध्या तपमान काहीसे स्थिरावले असून, शुक्रवारी व शनिवारी तपमान ११ ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. त्यामुळे शहरात थंडीचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवडाभरात तपमान १० ते ११ अंश सेल्सिअसच्या आत असल्याने नाशिक गारठले आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीची तीव्रता वाढत असून, बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेल्यानंतर गुरुवारी (दि.३०) तपमानात आणखी घसरण होऊन पारा १०.२ अंशांवर पोहोचला. मात्र त्यानंतर किमान तपमानाचा पारा काहीसा वधरला असला तरी कमाल तपमानात घसरण झाली आहे. शुक्रवारी (दि.१) ११.३, शनिवारी (दि.२) किमान तपमान ११.६ अंश सेल्सिअस नोंदले गेल्याने शहरातील तपमान स्थिरावले आहे.

Web Title: Pink cold climbs up; warm clothes: crowds exercising on grounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक