लुटमार करणाºयास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:14 AM2018-02-26T00:14:21+5:302018-02-26T00:14:21+5:30

तालुक्यातील राहुड गावाजवळ दोन अनोळखी तरुणांनी मोटारसायकलवरील एक महिला व पुरुषास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न करणाºयांपैकी एकास दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली आहे.

Police closet for robbery | लुटमार करणाºयास पोलीस कोठडी

लुटमार करणाºयास पोलीस कोठडी

Next

चांदवड : तालुक्यातील राहुड गावाजवळ दोन अनोळखी तरुणांनी मोटारसायकलवरील एक महिला व पुरुषास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूट करण्याचा प्रयत्न करणाºयांपैकी एकास दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली आहे.  घरमालक व भाडेकरू यांच्यातील वादामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. शनिवारी (दि. २४) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास माधुरी संतोष बनकर (रा. पिंपळगाव) व त्यांचे नातलग शिवाजी जमदाडे हे दोघे मोटारसायकलने मालेगावकडे जात होते. एका मोटारसायकलवरून दोन तरुण पाठीमागून पुढे जाताना राहुड गावाच्या पाठीमागून त्यांनी या मोटारसायकलवरील दोघांना कट मारून मनीषा बनकर यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली पोत तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.  या दोघांनी प्रसंगावधान राखून राहुड गाव गाठले. राहुड येथील ग्रामस्थांना सदरचा प्रकार सांगितला. याचवेळी हे दोघेही तरुण पाठीमागून येत होते. संशयिताचे नाव सुनील रामसाहय बैरवा (२६) यास चांदवड पोलीसांसी अटक केली होती. त्याच्याकडून मोटार- सायकलही जप्त केली होती. त्यालाच पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.  ग्रामस्थांनी पाठलाग करून एकास पकडले. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी एका पकडलेल्या संशयितास ताब्यात घेत त्याची झडती घेतली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस व मोटारसायकल असा सुमारे पंचवीस हजारांचा माल ताब्यात घेतला.

Web Title: Police closet for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस