खासदारांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:22 PM2020-10-05T22:22:01+5:302020-10-06T01:10:18+5:30

मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सकाळी अकरा वाजता संप मागे घेण्याचा निर्णय वहातुकदारांनी घेतला आहे.

Positive discussion mediated by MPs | खासदारांच्या मध्यस्तीने सकारात्मक चर्चा

मनमाड येथे गॅस प्रकल्पात आंदोलनकर्त्यांसमवेत चर्चा करताना खासदार डॉ. भारती पवार प्रसंगी उपस्थित प्रकल्प अधिकारी व वहातूकदार.

Next
ठळक मुद्देमनमाड :गॅस प्रकल्पातील वहातुकदारांच्या संपावर तोडगा

मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सकाळी अकरा वाजता संप मागे घेण्याचा निर्णय वहातुकदारांनी घेतला आहे.
  मनमाड पासून सात किमी अंतरावर पानेवाडी थोटाने परिसरात इंडियन आॅइल कंपनीचा गॅस रिफिलिंग प्रकल्प असून त्यातून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. त्यासाठी ट्रॅक वाहतुकीसाठी निविदा काढली जाते. प्रकल्पातील काही अधिकारी मनमानी करून अपमानास्पद वागणूक तर देत असताच शिवाय आता त्यांनी स्थानिक ऐवजी बाहेरच्या वाहतूकदारांकडून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप स्थानिक वाहतूक दारांनी करून संप पुकारला होता.
संपाच्या आजच्या तिसºया दिवशी या बाबद तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. भारती पवार,आमदार सुहास कांदे ,प्रकल्प व्यवस्थापक सुहास बनपूरकर यांच्या समवेत वहातूकदारांची बैठक घेण्यात आली. यात सकारात्मक चर्चा झाल्याने उद्या सकाळी संप मागे घेण्याचा निर्णय वहातूकदारांनी घेतला आहे. यावेळी वहातूकदार नाना पाटील ,रतन शाक द्विपी, कांतिलाल लुणावत, संजय पांडे, संजय चोपडा आदी उपस्थित होते. 

Web Title: Positive discussion mediated by MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.