मोबाइल संस्कृतीचा वापर कमी व्हावा प्रदीप पटवर्धन : पुरोहित एकांकिका स्पर्धेत पुण्याचे ‘आकार’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:13 AM2017-12-24T01:13:12+5:302017-12-24T01:13:47+5:30
नाशिकरोड : मोबाइल संस्कृतीचा कमी वापर करून एकांकिकेत काम करताना दिवसभरातील माणसांच्या वागण्याचे निरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी केले.
नाशिकरोड : मोबाइल संस्कृतीचा कमी वापर करून एकांकिकेत काम करताना दिवसभरातील माणसांच्या वागण्याचे निरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी केले. राज्यस्तरीय कै. वा. पुरोहित एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे येथील आकार या एकांकिकेने पटकावला.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कै. वा. पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी बोलताना पटवर्धन म्हणाले की, आई-वडील यांना सोडू नका ती तुमची सर्वांत मोठी संपत्ती आहे. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पटवर्धन यांनी दिली. तसेच पटवर्धन यांनी नाटकातील विनोदी संवाद सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी अध्यक्षपदावरून संस्थेचे कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, परीक्षक रमाकांत मुळे, देवदत्त पाठक, श्रुती चांदुरकर स्पर्धा प्रमुख हेमंत देशपांडे, सुधीर फडके उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरीय कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे येथील आकार या एकांकिकेला ४१ हजार रुपये रोख व चषक देण्यात आला. द्वितीय क्रमांक कोकमठाण येथील दांडगी मुले या एकांकिकेला ३५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक- सांगली येथील फुलपाखरू या एकांकिकेला ३१ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी बीना बनकर व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ, कामिनी पवार, पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय वैशाली गोसावी, हेमंत देशपांडे यांनी करून दिला. आभार सुधीर फडके यांनी मानले. कार्यक्रमास संकुल प्रमुख वसंत जोशी, शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, नरेंद्र ठाकरे, संजीवनी धामणे, ज्योती मोदियानी, सुरेश गायधनी, सुनील हिंगणे, सुरेश दीक्षित आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
पुरस्कार विजेते
वैयक्तिक स्त्री अभिनयामध्ये प्रथम - सानिका आपटे, द्वितीय-रविना सावंत, तृतीय- उत्तरा गायधनी, उत्तेजनार्थ- सिद्धी पाटील, केतकी भालवनकर, मृदुला चौघुले, वैयक्तिक पुरूष प्रथम- ओजस अत्तरदे, द्वितीय- रूचिका चव्हाण, तृतीय- अमित लोळगे, नेपथ्य प्रथम- चैतन्य थरकुडे, द्वितीय -प्रतिमा शिंदे, तृतीय- ज्योती पवार , संगीत योजना प्रथम- मनोहर म्हात्रे, द्वितीय- अभिजित केळकर, तृतीय- चैतन्य थरकुडे, वेशभूषा व रंगभूषा प्रथम- अनिकेत कालोखे, द्वितीय- ललित शिंदे तृतीय- मंगेश जाधव, दिग्दर्शन प्रथम- चैतन्य थरकुडे, द्वितीय- सुवर्णा निळे, तृतीय- राहुल जगताप, प्रकाश योजना प्रथम -चैतन्य थरकुडे, द्वितीय- प्रथमेश मानेकारी, तृतीय- मकरंद, मुकुंद यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.