अवैध दारू रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सीमा आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:52 PM2017-12-23T16:52:58+5:302017-12-23T16:55:11+5:30
नाशिक : ख्रिसमस व नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष साजरा करताना मद्यपिंकडून वाढणारी मद्याची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्यात दिव, दमण, सिल्व्हासा या केंद्रशासीत प्रदेशाातुन मोठ्या प्रमाणावर चोरी, छुप्या पद्धतीने दारू आणली जात असल्याने ती रोखण्यासाठी यंदा राज्य उत्पादन शुल्क खात्याने कंबर कसली आहे. जिल्ह्याच्या सीमाच कडेकोट बंदोबस्तात आवळण्याबरोबर भरारी पथकांच्या माध्यमातून संशयास्पद वाहनांची तपासणी तसेच चोरून दारू विक्री करणाºया अड्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना ही माहिती दिली. जिल्ह्यात चोरी छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतुक केली जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या वेळोवेळी पडणाºया छाप्यातून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर नाशिक जिल्ह्यात लगतच्या दीव, दमण, सिल्व्हासा या केंद्र शासीत भागातून दारूची वाहतूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक त्र्यंबकरोडवरील अंबोली, हरसूल, राजबारी (पेठ) व बोरगाव (सुरगाणा) या प्रमुख रस्त्यांवर चेकनाके उभारले आहेत. शनिवारपासून चेकनाके कार्यान्वित झाले असून, त्यात प्रामुख्याने नाशिककडे येणाºया वाहनांची तपासणी केली जात आहे. चोवीस तास सदरचे नाके कार्यान्वित राहणार असल्याचे राजपुत यांनी सांगितले. या शिवाय विशेष पथके व भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून, उत्पादन शुल्क उप अधिक्षकांच्या नेतृत्वाखालील पथक जिल्ह्यात कार्यरत राहील. साधारणत: येवला, सिन्नर, मालेगाव, मनमाड या भागात अवैध दारू वाहतुक व विक्रीचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.