जिल्ह्यात वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम
By admin | Published: October 16, 2016 09:39 PM2016-10-16T21:39:34+5:302016-10-16T21:59:07+5:30
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस : पुस्तक प्रदर्शन; शाळा, महाविद्यालयांमध्ये ग्रंथवाचन
चांदवड
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी पुस्तक प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन केले.चांदवड : येथील आबड -लोढा -जैन महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. यावेळी अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागप्रमुख प्रा.ए.ए.वकील होते. तर प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.तुषार चांदवडकर यांनी डॉ. कलामांचा जन्मदिन हा एक वाचन व लेखनप्रिय , शिक्षणप्रेमी राष्ट्रपतीचा जन्मदिवस का साजरा केला जातो. यांची माहिती दिली. यानंतर काव्यवाचनाचा कार्यक्रम पुनम सोनवणे, भारती बटाव, सोमनाथ शिंदे, नंदु चव्हाण यांनी कविता सादर केल्यात. प्रा.,डॉ. तुषार चांदवडकर, प्रा. डॉ. सी.के. कुदनर, प्रा. सिताराम मुरकुटे, प्रा. संदीप पगारे, गौतम सोनवणे यांनी कविता सादर केल्यात प्रा. आर.जे.इंगोले यांनी वाचनाचे महत्व स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आज स्पर्धा परिक्षासाठीच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात वाचन केले तरच पुढे जाता येऊ शकते. उत्कृष्ट संभाषणासाठी देखील उत्तम वाचन गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येक विद्यार्र्थ्याने महाविद्यालयात क्रमिक पुस्तकांच्या व्यतिरिक्त अन्य पुस्तके आर्वजुन वाचावीत यानंतर प्रा. ए.ए. वकील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन झाल्याची घोषणा केली. पुस्तके आपली खरे मित्र असतात. चांगली सकारात्मक पुस्तके जीवनाला आकार देतात. त्यामुळे आपण उत्तमोत्म पुस्तके वाचली पाहिजेत . वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समुध्द समाजाची घडण व्यक्तिमत्व विकास साहित्य विकास आणि भाषा विकास यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार अािण विकास करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच वाचन प्रेरणा दिनासारखे उपक्रम योजणे गरजेचे आहे. यानंतर प्रा. सिताराम मुरकुटे यांनी आभार मानले.
जिल्हा परिषद शाळा
येथील जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणादिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य चंंद्रकांत गवळी होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी शहरातील सार्वजनिक वाचनालयात प्रभातफेरीने जाऊन ग्रंथप्रदर्शनाची पाहणी केली. वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, सचिव डी.पी. शेळके सिताराम वाबळे, नितीन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अशोक वाघ, खंडु सोनवणे, शांताराम हांडगे, वनिता अहेर, शीतल कापडणीस उपस्थित होते. सूत्रसंचालन शांताराम हांडगे यांनी केले.
अध्यापक विद्यालयात
अनोखा संकल्प
येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संचलित सौ. लिलाबाई दलुभाऊ जैन अध्यापक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ. संगीता बाफना होत्या. त्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती सांगीतली. त्यानंतर सर्व छायाध्यापकांनी दररोज कुठल्याही परिस्थितीत एक तास तरी वाचन करण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर छात्राध्यापकांना महान व्यक्तीमत्वांची पुस्तके वाचनासाठी देण्यात आली. त्यानंतर वाचलेल्या पुस्तकातील विचार छात्राध्यापकानी सारांश रुपात सर्वाना समीक्षमाच्या माध्यमातुन सांगीतले. याप्रसंगी प्रा.धनंजय मोरे, प्रा. समाधान जगताप, प्रा. सुप्रिया सोनवणे आदि उपस्थित होते.
धोंडबे विद्यालयात
क.का. वाघ हायस्कुल धोंडबे या शाळेत मुख्याध्यापक एस.एम. वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जी. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्ताने वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा झाला. प्रास्ताविक व्ही.के. उशीर यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकाचे वाचन केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक ई.बी. उशीर , एस.एच. गायकवाड , एस.आर. मोगल आदि उपस्थित होते.
सोग्रस शाळेत
येथील सोग्रस जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. प्रभातफेरी काढुन जनजागृत्ती करण्यात आली. वाचनकट्याचे गट करुन त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ अहिरे यांचे हस्ते झाले. विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करण्यात आली. याप्रंसगी सरपंच , उपसरपंच केंद्रप्रमुख ठोकेसर , शालेय समिती सदस्य मुख्याध्यापक मधुसुदन अहिरे यांनी प्रास्ताविक केले. यावषळी साहेबराव पवार, श्रीमती शोभा जाधव , भावसिंग बच्छाव, शिवाजी खैरनार, निळकंठ येवला, श्रीमती सुनीता शिरसाठ, श्रीमती स्मिता पाटील आदि उपस्थित होते. (लोकमत चमू)