१६ नव्या आरोग्य केंद्रांचा प्रस्तावमहापालिका : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
By admin | Published: June 15, 2014 01:04 AM2014-06-15T01:04:28+5:302014-06-15T18:23:42+5:30
१६ नव्या आरोग्य केंद्रांचा प्रस्तावमहापालिका : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान
नाशिक : शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांना तत्काळ आवश्यक त्या सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत नवीन १६ आरोग्य केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून, येत्या महासभेत त्यावर चर्चा होणार आहे.
देशातील शहरी लोकसंख्येचा वाढता वेग आणि त्या शहरातील असंघटित कामगारांसह आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात येणारी आरोग्य सुविधा अपूर्ण असून, त्यासाठी शहरी भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मानांकने निश्चित करण्यात आली आहेत. त्यात २५० ते ५०० लोकसंख्येकरिता एक महिला आरोग्य समिती, एक हजार ते २५०० लोकसंख्येसाठी एक कम्युनिटी हेल्थ सेंटर, १० हजार लोकसंख्येसाठी एक परिचारिका, ५० हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असे उपाय सुचविण्यात आले आहेत.
नाशिक महापालिका क्षेत्रात सध्या ३२ शहरी आरोग्य केंद्रांची आवश्यकता असून, त्यापैकी १६ केंद्रे कार्यान्वित असून
१६ शहरी आरोेग्य केंदे्र प्रस्तावित
आहेत. त्यासाठी संबंधित मनुष्यबळ भरण्यासाठी महानगरपालिका स्तरावर समिती गठीत करण्यात येणार
असून त्याद्वारे थेट मुलाखतीतून पदेही भरण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या येत्या महासभेत चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)