आकाशाला गवसणी घाला

By Admin | Published: January 17, 2016 10:41 PM2016-01-17T22:41:59+5:302016-01-17T22:45:04+5:30

प्रशांत खंबासवाडकर : वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Put the sky on the sky | आकाशाला गवसणी घाला

आकाशाला गवसणी घाला

googlenewsNext

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एचपीटी आटर््स आणि आरवायके सायन्स कॉलेज यांच्यातर्फे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. युनिव्हर्सल ग्रुप, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे प्रशांत खंबासवाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर मेहनत करण्याचे तसेच आपल्या घरापासून दूर राहून आकाशाला नक्कीच गवसणी घालता येईल, याबाबत आवाहन केले.
यावेळी खंबासवाडकर यांनी बीवायके महाविद्यालयात शिकत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भूतकाळात जे क्षण आपण जगतो ते विसरता कामा नये, अशा क्षणांभोवती पुन्हा फिरून चांगले आयुष्य घडविण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ तोडून नाशिकबाहेर पडण्याचे अधोरेखित केले.
सभागृहांमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुरेशी जागा नसल्याने महाविद्यालयातील कार्यक्रमांसाठी मोठ्या सभागृहाची आवश्यकता असून या सभागृहाचे २०१८ साली गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवात लोकार्पण करण्यात येऊन या सभागृहाला ‘गुरुदक्षिणा’ नाव देण्यात येणार असल्याचेही खंबासवाडकर यांनी सांगितले.
यावेळी वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धा, तसेच परीक्षांमधून यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्वाेत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सुरेश नखाते, सर्वाेत्कृष्ट विद्यार्थिनी भक्ती आठवले यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी, प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य रूपन सिंग , डॉ. एस. आर. खंडेलवाल, आर. टी. आहेर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी, तर अहवाल वाचन सुरेश नखाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणव रत्नपारखी, डॉ. लिना हुन्नरगीकर, डॉ. उदया बारसकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Put the sky on the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.