गस्त पथकासाठी ‘क्यूआर कोड’ स्कॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:05 AM2017-09-01T01:05:17+5:302017-09-01T01:05:43+5:30
इंदिरानगर : शहरामध्ये वाढणाºया गुन्हेगारीला आळा बसावा, पोलीस गस्तविषयी लोकांमध्ये विश्वासार्हता आणि कर्मचाºयांमध्ये गांभीर्य वाढावे, यासाठी पोलीस आयुक्तालयाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘ब्लॅक स्पॉट’वर क्यूआर कोड बसविला असून, हा कोड गस्तीदरम्यान, कर्मचाºयाला तेथे जाऊन मोबाइलने स्कॅन करावा लागणार आहे.

‘क्यूआर कोड’मुळे पोलीस कर्मचाºयांकडून गस्त गंभीरपणे व प्रामाणिकपणे घालण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचा विश्वास अधिकाºयांना आहे. बीट मार्शल, गस्त पथक वाहनातील कर्मचाºयांना आपल्या मोबाइलद्वारे पोलीस ठाणे हद्दीतील विविध भागांमध्ये बसविलेला क्यूआर कोड गस्तीदरम्यान स्कॅन करणे बंधनकारक राहणार आहे. या कोडच्या स्कॅनिंगनंतर संबंधित पोलीस त्या भागात पोहचला व कोणत्या वेळेस त्याने क्यूआर कोड स्कॅन केला याची माहिती आयुक्तालयाला मिळण्यास मदत होणार आहे. हा आगळावेगळा प्रयत्न आयुक्तालयामार्फत इंदिरानगर परिसरात सुरू करण्यात आला आहे. विविध परिसरातील अपार्टमेंट, चौकांमध्ये क्यूआर कोड बसविण्यास सुरुवात झाली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याची हद्द नासर्डी ते विल्होळी जकात नाका आणि राजीवनगर, चेतनानगर, राणेनगर यासह वडाळागाव परिसरापर्यंत आहे. भौगोलिक दृष्ट्या ही हद्द मोठी असून, कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्यामुळे गुन्हेगारीही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच काही कर्मचाºयांकडून संपूर्ण परिसरात गस्त घालण्याबाबत काणाडोळा केला जातो. यामुळे आयुक्तालयाकडून ‘क्यूआर कोड’चा नवा प्रयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविला जाणार आहे.