‘राणा की सेना’ची चित्रपटगृहांना तंबी ;  ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:53 AM2017-11-14T00:53:24+5:302017-11-14T00:56:55+5:30

 Rana's army crackdown on theaters; 'Padmavati' should not be shown in the film | ‘राणा की सेना’ची चित्रपटगृहांना तंबी ;  ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये

‘राणा की सेना’ची चित्रपटगृहांना तंबी ;  ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये

googlenewsNext
ठळक मुद्दे राजपुत समाजातील महाराणींचा चुकीच्या पद्धतीने चित्रीकरण राजपुत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश राजपुत समाजाला भडकाविण्याचे काम

नाशिक : राजपुत समाजाच्या भावना दुखावणारा ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करू नये, असे पत्र राणा की सेना या संघटनेने शहरातील सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना दिले असून, चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाºया नुकसानीस जबाबदार राहणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
कॉलेजरोडवरील सिनेमॅक्स या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, हिंदू धर्माचा व राजपुत समाजातील महाराणींचा चुकीच्या पद्धतीने चित्रपटात चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे राजपुत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश निर्माण झाला असून, या पद्धतीने आमच्या माता-भगिनींच्या चित्रीकरणातून अवमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय लीला भन्साळी यांना दुसºया राष्ट्रातून हा चित्रपट बनविण्यासाठी पैसे मिळाले असल्याचा संशय असून, हिंदू धर्माच्या महिलांचा व राजपुत समाजाला भडकाविण्याचे काम यामार्फत केले जात आहे. त्यामुळे ‘पद्मावती’ चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करू नये अन्यथा जिल्ह्यात जे आंदोलन होईल त्यास संघटना जबाबदार राहणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वसंत ठाकूर, प्रवीण काटे, विशाल राजपुत, वैभव शेलार, आनंद परदेशी, राकेश परदेशी, रणजित परदेशी, सुदेश मोरे, योगेश परदेशी, नरेश राजपुत, नीलेश परीट, शिवा चव्हाण, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

Web Title:  Rana's army crackdown on theaters; 'Padmavati' should not be shown in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.