फळभाज्यांचे दर तेजीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:36 AM2017-10-31T00:36:03+5:302017-10-31T00:36:09+5:30
पंधरवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा वांगी तसेच शिमला मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात वांगी तसेच शिमला मिरचीचे बाजारभाव टिकून आहेत. फळभाज्यांच्या दरात तेजी निर्माण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदीसाठी खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. फळभाज्यांची वाढलेली मागणी व त्यातच आवक कमी होत असल्याने सध्या फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत.
पंचवटी : पंधरवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा वांगी तसेच शिमला मिरचीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याने बाजारात वांगी तसेच शिमला मिरचीचे बाजारभाव टिकून आहेत. फळभाज्यांच्या दरात तेजी निर्माण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळचा भाजीपाला खरेदीसाठी खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. फळभाज्यांची वाढलेली मागणी व त्यातच आवक कमी होत असल्याने सध्या फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. ग्राहकांना वांगी खरेदीसाठी किमान ७० रुपये किलोसाठी मोजावे लागतात, तर टमाटा ५० रुपये, कारली २०, तर दोडके ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. शिमला मिरची व वांग्याचे उत्पादन पावसामुळे घटलेले असल्याने बाजारभाव टिकून आहेत. मेघना, मंजिरी तसेच पंचगंगा जातीची वांगी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने त्यांनाही ग्राहकांकडून मागणी आहे.
ग्राहकांना फटका
परतीच्या पावसामुळे शेतातील उभे पीक नाश पावल्याने त्याचा परिणाम फळभाज्यांच्या आवक वर झालेला आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने सध्या ग्राहकांना फळभाज्या खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे.