मनमाड सार्वजनिक वाचनालयात वाचक प्रेरणा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 09:02 PM2020-10-15T21:02:48+5:302020-10-16T01:53:37+5:30
मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयात थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता.
मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयात थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून मोहिनी माणके होते तर व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी, नरेश गुजराथी, प्रज्ञेश खांदाट आदी उपस्थित होते.
वाचनालयाचे संचालक व माजी सचिव स्व.किशोर नावरकर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मान्यवर अतिथींच्या हस्ते ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. वाचनालयाचे माजी सभासद स्व.सुरेश माणके व स्व.मनिष सुरेश माणके यांचे कुटुंबीय मोहिनी मानके यांनी वाचनालयास ४० हजार रु पये किंमतीची ३६४ पुस्तके भेट दिली. या वेळी अक्षय सानप, राहूल लांबोळे, ग्रंथपाल संध्या गुजराथी, हेमंत मटकर, नंदिनी फुलभाटी आदी मान्यवरांसह वाचक उपस्थित होते. कार्यक्र माचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.
(फोटो १५ मनमाड १)
मनमाड सार्वजनिक वाचनालयात वाचक प्रेरणा दिन प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित नितीन पांडे, सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी, मोहिनी मानके आदी.