बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघु, मध्यम उद्योगांची भूमिका महत्वाची : अनंत गिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:10 PM2017-10-30T15:10:55+5:302017-10-30T16:17:44+5:30

सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवणून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची असून या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रलयाल प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन

 The role of small and medium enterprises is important in getting jobs in unemployed youth: Anant Gite | बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघु, मध्यम उद्योगांची भूमिका महत्वाची : अनंत गिते

बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघु, मध्यम उद्योगांची भूमिका महत्वाची : अनंत गिते

Next
ठळक मुद्दे देशात सध्या मोठय़ा प्रमाणात बेरोजगारीची समस्यारोजगार मिळवणून देण्यात लघुउद्योगांची भूमिका महत्वाचीउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशीलमेक इन इंडियाला बळ देण्यासाठी मेक इन नाशिकलघु,मध्यम उद्योग विकासावर देशाचे अर्थकारण अवलंबून

नाशिक : देशात सध्या मोठय़ा प्रमाणात बेरोजगारीची समस्या असून सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवणून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची असून या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रलयाल प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री यांनी केले आहे.
नाशिक इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे मेक इन नाशिकअंतर्गत गेटवे होटेल अंबड येथे वेंडर डेव्हलपमेंट शिबिराचे अनंत गिते यांच्या हस्ते सोमवारी (दि.30) उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मधुकर ब्राम्हणकर, हरिशंकर बनर्जी रामाशिष भूतडा आदि उपस्थित होते. गिते म्हणाले, मेक इन इंडियाला बळ देण्यासाठी मेक इन नाशिकची निर्मिती करण्यात आली असून देशातील औद्योगिक स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी मेक इन नाशिकची महत्वाची भूमिका आहे. देशातील मोठय़ा उद्योगांसोबतच लहान व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांच्या विकासावर देशाचे अर्थकारण अवलंबून आहे. या उद्योगांमधील स्पर्धेसोबतच गुवत्तात्मक वाढ होणो अपेक्षित असून स्पर्धात्मक वाढ ही औद्योगिक विकासाला पोषक असल्याचे आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने तोटय़ात असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लिमिटेड (बीएचईएल) ला तोट्यातून बाहेर काढण्यात सरकारला यश आले असून अन्य उद्योगक्षेत्रच्या विकासासाठी मेक इन इंडिया अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले.

Web Title:  The role of small and medium enterprises is important in getting jobs in unemployed youth: Anant Gite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.