औष्णिक वीज केंद्रात सुरक्षा सप्ताह ऊर्जा विभाग : सुरक्षेबाबत कामगारांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:55 AM2018-01-26T00:55:51+5:302018-01-26T01:10:47+5:30
एकलहरे : महाराष्टÑ शासनाच्या ऊर्जा विभागांतर्गत नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात विद्युत सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
एकलहरे : महाराष्टÑ शासनाच्या ऊर्जा विभागांतर्गत नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात विद्युत सुरक्षितता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांचे हस्ते शक्तिमान मुख्य प्रवेशद्वार येथे झाले होते. त्यानंतर सप्ताहभरात विद्यार्थी, कामगार, कंत्राटदार, कंत्राटी कामगार, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा व व्याख्याने घेण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा व कामगारांकरिता व्याख्यान व प्रशिक्षण घेण्यात आले. बुधवारी सप्ताहाच्या समारोपदिनी कर्मचाºयांसाठी ‘विद्युत सुरक्षितता उपयुक्त सूचना’ स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता राजेंद्र खानापूरकर, सुनील इंगळे, अधीक्षक अभियंता देवेंद्र माशाळकर, राकेश कमटमकर, मनोहर तायडे, सूर्यकांत पवार उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सप्ताहातील विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक पी.एस. लोटके यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री गोरे व आभार विजय रावळ यांनी मानले. यावेळी प्रशांत लोटके, विजय रावळ, गुलाब पवार, जयश्री गोरे आदींसह अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.