नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान

By संजय पाठक | Published: May 20, 2024 03:13 PM2024-05-20T15:13:45+5:302024-05-20T15:14:54+5:30

'व्होट कर नाशिककर' या प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

Sayli Sanjeev, Akshay Mudwadkar and other celebrities voted in Nashik | नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान

नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुदवाडकर यांच्यासह अन्य सेलीब्रिटींनी केले मतदान

संजय पाठक, नाशिक: व्होट कर नाशिककर या प्रशासन आणि अन्य सेवाभावी संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेत्री सायली संजीव, अक्षय मुडावदकर यांच्यासह अन्य अनेकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नाशिकमधील शासकीय यंत्रणा तसेच खासगी सेवाभावी संस्थांनी देखील व्होटकर नाशिककर अशी मोहिम राबवली. यात केवळ नागरीकच नव्हे परंतु व्यस्त असलेले खेळाडू, कलावंत यांनी देखील मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद दिला.

दूरचित्रवाणी मालिकेसाठी मुंबईत सध्या वास्तव्य करणाऱ्या सायली संजीव, श्री स्वामी समर्थ मालिकेतील स्वामींची भूमिका निभावणारे अक्षय मुडवाडकर यांनी सकाळी मतदान केले. त्याच बरोबर अभिनेते सी. एल. कुलकर्णी, नृपूर सावजी, कथक नृत्यांगना रेखा नाडगौडा, बासरीवादक मोहन उपासनी यांच्यासह अन्य मान्यवरांनी मतदान केले.

Web Title: Sayli Sanjeev, Akshay Mudwadkar and other celebrities voted in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.