शिवसेनेचा विरोध : रहिवासी भागातील अतिक्रमणे काढण्यास विरोध अतिक्रमणास सिडको प्रशासनच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:34 AM2018-05-19T01:34:29+5:302018-05-19T01:34:29+5:30
सिडको : घराच्या वाढीव बांधकामासाठी परवानगी घेण्याकरिता जाणाऱ्या नागरिकांना परवानगी न देता त्यांच्याकडून चिरीमिरी घेत अनधिकृत बांधकाम करण्यास मुभा देण्याचा प्रकार सिडको प्रशासनातील अधिकाºयांकडून आजवर होत आल्याने सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मनपा आयुक्तांनी सिडकोच्या घरांचे अतिक्रमणे काढावयाचे असल्यास अतिक्रमणास खतपाणी घालणाºया सिडकोच्या अधिकाºयांची प्रथम चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी व नंतरच सिडकोच्या रहिवासी घरांच्या अतिक्रमणाचा विचार करावा. असे न करता अतिक्रमणे काढण्याचा विचार केल्यास मनपा प्रशासनाच्या विरोधात सिडकोची संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाइलने जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिडकोने १९७७ साली शेतकºयांच्या जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने घरांची निर्मिती केली. प्रशासनाने घरे बांधताना देण्यात येणाºया सोयी-सुविधा दिल्या तर नाहीच; परंतु दिलेल्या जागेत वाढीव बांधकाम करण्यास परवानगी घेण्यासाठी जाणाºया नागरिकांना परवानगी न देता संबंधित अधिकाºयांनी चिरीमिरी घेत आर्थिक तडजोड करून परवानगी न घेताच बांधकाम करण्याची मुभा दिली गेल्याने आज संपूर्ण सिडकोच्या रहिवासी भागात अतिक्रमणे झाली आहेत. सिडको प्रशासनाने त्यांच्या ताब्यातील सर्व सहा योजना मनपाकडे हस्तांतरित करून आता वाढीव बांधकामात झालेल्या अतिक्रमणाबाबत हात झटकण्याचा प्रकार करीत आहे; परंतु यापुढील काळात अतिक्रमणे होऊ नये यासाठी मनपाने नियमावली करणे गरजेचे आहे. आजच्या स्थितीत रहिवासी भागात झालेली अतिक्रमणे काढताना मनपा प्रशासनाने प्रथम सिडकोच्या अधिकाºयांची चौकशी करावी, असेही मामा ठाकरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस बाळ भाटिया, सुभाष बागड, सुरेश देवरे, विनोद शेलार, हिरण आदी उपस्थित होते.