बडगुजरांच्या हकालपट्टीसाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:46 PM2017-09-29T23:46:43+5:302017-09-29T23:46:50+5:30

पाणीपुरवठ्याचे निमित्त : सेनेतील गटबाजी नाशिक : नाशिक शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी घेऊन शिवसेनेने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली असली तरी, सेनेच्या ही खेळी त्यांच्यातच अंतर्गत गटबाजी वाढविण्यास कारणीभूत ठरली असून, शहराला दोन वेळ पाणीपुरवठा शक्य नसल्याची भूमिका सेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घेतल्याने त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मोहीम सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने हाती घेतल्याचे वृत्त आहे.

 Signature campaign for Badguzar's expulsion | बडगुजरांच्या हकालपट्टीसाठी स्वाक्षरी मोहीम

बडगुजरांच्या हकालपट्टीसाठी स्वाक्षरी मोहीम

googlenewsNext

नाशिक : नाशिक शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी घेऊन शिवसेनेने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली असली तरी, सेनेच्या ही खेळी त्यांच्यातच अंतर्गत गटबाजी वाढविण्यास कारणीभूत ठरली असून, शहराला दोन वेळ पाणीपुरवठा शक्य नसल्याची भूमिका सेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घेतल्याने त्यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्याची मोहीम सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने हाती घेतल्याचे वृत्त आहे.
यंदा गंगापूर धरण शंभर टक्के भरून समूहातही तितकाच पाणीसाठा असून, नाशिकच्या पाण्यावर डोळा ठेवून असलेले मराठवाड्यातील जायकवाडी धरणही पूर्ण भरले आहे. त्यामुळे नाशिककरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे म्हणून शहरात दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यासाठी ३७ पैकी ३५ नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र सेनेने महापालिका आयुक्तांना दिले आहे. या माागणीतून सत्ताधारी भाजपाची राजकीय कोंडी करण्याचा सेनेचा अंतस्थ हेतु असला तरी, त्यातून सेनेतील गटबाजीच उघड झाली आहे. सेनेच्या ज्या दोन नगरसेवकांची दोन वेळा पाण्याच्या मागणी निवेदनावर स्वाक्षरी नाही, त्यात सुधाकर बडगुजर व त्यांची पत्नी हर्षदा या दोघांचा समावेश आहे. बडगुजर यांना पक्षानेच टाळले की त्यांनीच या निवेदनावर स्वाक्षरी केली नाही हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी, बडगुजर यांनी मात्र या विषयावर सिडकोच्या प्रभाग समितीच्या सभेत आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते शहरात व विशेषत: सिडकोत दोन वेळा पाणीपुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे सांगितले. बडगुजर यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या मागणीच्या विरोधातच भूमिका घेतल्याचा अर्थ त्यातून काढला गेला व सेनेतील गटबाजी तत्काळ उफाळून आली. मुळातच महापालिका निवडणुकीपासूनच सेनेंतर्गत गटबाजीची खदखद कायम असून, बडगुजर यांनी पक्षाविरोधी भूमिका घेतल्याची सबब पुढे करीत, सेनेच्या नेतृत्वाने बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करावी यासाठी कंबर कसली आहे. त्याबाबतच्या हालचाली गतिमान होऊन सेनेच्या नगरसेवकांना ‘निरोप’ देऊन निवेदन तयार करण्यात आले व बडगुजर यांची हकालपट्टी करावी यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दहा नगरसेवकांच्या निवेदनावर स्वाक्षºया झाल्या असून, सेनेचा दसरा मेळावा आटोपल्यानंतर यावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Signature campaign for Badguzar's expulsion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.