एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीचा प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:09 AM2018-05-01T02:09:32+5:302018-05-01T02:09:32+5:30
सलग पंधरा दिवसांपासून एस. टी. कर्मचाºयांच्या वेतनवाढीच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेत सन्मानजनक तोडगा न निघाल्याने मान्यताप्राप्त संघटनेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामुळे कामगारदिनी कामगारांना खुशखबर देण्याचे महामंडळाचे मनसुबे उधळले आहेत.
नाशिक : सलग पंधरा दिवसांपासून एस. टी. कर्मचाºयांच्या वेतनवाढीच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेत सन्मानजनक तोडगा न निघाल्याने मान्यताप्राप्त संघटनेने प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यामुळे कामगारदिनी कामगारांना खुशखबर देण्याचे महामंडळाचे मनसुबे उधळले आहेत.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमवेतच्या बैठकांमध्ये संघटनेसमवेत झालेल्या बैठकांमध्ये एकमत न झाल्याने चर्चा निष्फळ ठरली आहे. पगार वाढीबद्दलची महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. सदर बैठकीत मान्यताप्राप्त संघटना ३१ मार्च १९९६चे मूळवेतन + ३५०० गुणिले २.५७ या प्रस्तावावर ठाम होती. परंतु कामगारांना लवकरात लवकर सन्मानजनक पगारवाढ व्हावी हा उद्देश समोर ठेवून मान्यताप्राप्त संघटनेने आपल्या सूत्रातील रकमेत थोडी फार तडजोड करण्याचे ठरविले व तसा प्रस्तावही दिला. परंतु परिवहनमंत्र्यांनी फक्त भत्ते व सीटीसी वगळता ७५० कोटींच देण्याची तयारी दर्शवली यामध्ये आपले सूत्र बसवण्याचा आग्रह त्यांनी केला. परंतु यामध्ये आयोगाचा २.५७चा प्रस्ताव बसत नाही. तसेच दुसरा प्रस्ताव मूळवेतन गुणिले २.४१ तसेच भत्ते स्वरूपात मूळवेतनात न देता एकूण पगारावर चार हजार, पाच हजार व सहा हजार अशी पगारवाढ असे एकूण दोन प्रस्ताव देण्यात आले. अर्थात चार ते सहा हजार रुपये वाढीच्या प्रस्तावात फक्त भत्ते स्वरूपात यावर कोणतीही अनुषंगिक वाढ नाही. सदरची वाढ ही फक्त ३१ मार्च २०३०पर्यंतच मर्यादित राहणार आहे. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या दुसरा प्रस्ताव जरी दिसायला बरा वाटत असेल तरी सदर प्रस्तावामुळे पगारवाढ समाधानकारक नसल्याने संघटनेने तो फेटाळून लावला, तर मान्यताप्राप्त संघटनेकडून दिलेला कनिष्ठ कर्मचाºयाबद्दलचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने मान्य करण्यात आला असून, कनिष्ठ कामगारांना वेतनवाढी देऊन नवीन कराराचा लाभ देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. अजूनही २.५७च्या प्रस्तावावर संघटनेची चर्चेची तयारी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.