आॅपरेशन गोमाता यशस्वी...
By admin | Published: May 7, 2017 01:16 AM2017-05-07T01:16:20+5:302017-05-07T01:16:30+5:30
परिसरातून एक गोमाता एका चेंबरवरील स्लॅबवर पोहचली. सदर स्लॅब जीर्ण झालेला असल्याने गायीच्या वजनाने तो धसला आणि गाय चेंबरमध्ये कोसळली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वेळ दुपारी साडेचार वाजेची. ठिकाण पोलीस मुख्यालय वसाहत. परिसरातून एक गोमाता रणरणत्या उन्हात सावलीच्या शोधात जात असताना अचानकपणे एका चेंबरवरील स्लॅबवर पोहचली. सदर स्लॅब जीर्ण झालेला असल्याने गायीच्या वजनाने तो धसला आणि गाय चेंबरमध्ये कोसळली. ‘रेस्क्यू’साठी परिसरातील रहिवाशांनी अग्निशमन दलाला ‘कॉल’ दिला.
पोलीस वसाहतीमधून मार्गस्थ होणारी गाय अचानकपणे चेंबरचा स्लॅब धसल्याने चेंबरमध्ये कोसळली. यावेळी गायीच्या अंगावर सीमेंटचे तुकडे पडले आणि सुमारे चार फुटापेक्षा अधिक मोठे चेंबर असल्याने गायीला धसलेल्या स्लॅबच्या खड्ड्यातून पुन्हा बाहेर येणे अवघड झाले होते. त्यामुळे ती जोरजोराने हंबरडा फोडत होती. यावेळी परिसरातील युवक, महिला चेंबरभोवती जमा झाले आणि त्यांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेता तातडीने अग्निशामक केंद्राला मदतीसाठी बोलाविले. घटनेची माहिती मिळताच तातडीने शिंगाडा तलाव येथील मुख्यालयामधून ‘रेस्क्यू व्हॅन’सह अग्निशामक दलाचे जवान पोलीस मुख्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले.