निवृत्तीच्या उंबरठ्यावर वैद्यकीय अधिकाऱ्याचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 07:44 PM2017-10-26T19:44:59+5:302017-10-26T19:47:01+5:30
मायको रुग्णालय : आयुक्तांकडून निलंबनाचे आदेश जारी
नाशिक : पंचवटीतील महापालिकेच्या मायको रुग्णालयातील महिलेच्या प्रसूतीप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह चार परिचारिकांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. कोकणी हे येत्या ३१ आॅक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, निवृत्तीच्या उंबरठ्यावरच कोकणी यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
पंचवटीतील मायको रुग्णालयात गेल्या सोमवारी (दि.२३) एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली असता रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह सर्व परिचारिका आॅनड्युटी गायब होत्या. त्यामुळे वेळेवर मदत न मिळाल्याने सदर महिलेची प्रसूती तिला रुग्णालयात घेऊन आलेल्या रिक्षातच झाली होती. या साºया प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेत तातडीने चौकशी केली होती. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी वैद्यकीय अधिकाºयासह पाच परिचारिकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली होती, तर सुरक्षारक्षकाच्या बडतर्फीचा प्रस्ताव प्रशासन उपआयुक्तांकडे पाठविला होता. मात्र, दुसºयाच दिवशी डेकाटे यांनी निलंबनाच्या प्रक्रियेऐवजी कर्मचाºयांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचे सांगत एकूणच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण केला होता. परंतु, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सदर प्रकार विसंवादातून झाल्याचे सांगत वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी, परिचारिका मनीषा शिंदे, सरला रूपवते, भारती कोठारी आणि एम. एम. ठाकूर यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. कंत्राटी कर्मचारी श्रीमती देशमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली जाणार असून, त्याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव वैद्यकीय विभागाकडून मागविल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. निलंबित करण्यात आलेले डॉ. हिरामण कोकणी हे दि. ३१ आॅक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. निवृत्तीला अवघा आठवडा उरला असताना डॉ. कोकणी यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ जवळ आल्याने विभागीय चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने निलंबनाची कारवाई केली गेली.
परदेश दौऱ्याचीही होणार चौकशी
वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यासह एक परिचारिका आणि महापालिकेच्याच आणखी एका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हे विनापरवानगी परदेश दौºयावर गेल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत महापालिकेकडे कोणताही अधिकृत खुलासा आलेला नाही. सध्या या अधिकाºयांची विभागीय चौकशी केली जाणार असून, त्यानंतर त्यांच्या पासपोर्टसह अन्य बाबींबाबत लक्ष घालण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले.