कांदा व्यापा-यांवर धाडी, लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, येवला, सटाणा, उमराणेत छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:12 AM2017-09-15T00:12:58+5:302017-09-15T03:58:03+5:30

नाशिक : जिल्ह्यात आठ बड्या कांदा व्यापा-यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १४) सकाळी धाडी टाकल्या. व्यापाºयांची कार्यालये, निवासस्थाने व कांद्याची खळे येथे हे छापे टाकण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावातील दोन, चांदवड, सटाणा, उमराणे, येवला, पिंपळगाव व नामपूर येथील प्रत्येकी एका व्यापाºयाचा त्यात समावेश आहे. आयकर विभागाचे धाडसत्र उशिरापर्यंत सुरू होते.

Thread on onion trading | कांदा व्यापा-यांवर धाडी, लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, येवला, सटाणा, उमराणेत छापे

कांदा व्यापा-यांवर धाडी, लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, येवला, सटाणा, उमराणेत छापे

Next

नाशिक : जिल्ह्यात आठ बड्या कांदा व्यापा-यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी गुरुवारी (दि. १४) सकाळी धाडी टाकल्या. व्यापाºयांची कार्यालये, निवासस्थाने व कांद्याची खळे येथे हे छापे टाकण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावातील दोन, चांदवड, सटाणा, उमराणे, येवला, पिंपळगाव व नामपूर येथील प्रत्येकी एका व्यापाºयाचा त्यात समावेश आहे. आयकर विभागाचे धाडसत्र उशिरापर्यंत सुरू होते.
दरम्यान, या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापारी लिलावात न आल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प झाले. गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या अधिकाºयांनी लासलगावी खासगी वाहनाद्वारे धडक देत अचानक छापे टाकले. येथील कांदा व्यापारी ओमप्रकाश राका आणि साईबाबा ट्रेडिंग कंपनीचे कांतीलाल सुराणा या दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामुळे कांदा व्यापारीवर्गात खळबळ उडाली.सुरुवातीला हे अधिकारी विंचूर रोडवरील एका लॉन्सजवळ दाखल झाले. त्यांनी पोलीस बंदोबस्तात व्यापाºयांच्या कार्यालयात तसेच खळ्यांवर छापे टाकले. ही घटना लासलगाव येथे वाºयासारखी पसरताच प्रामुख्याने इतर कांदा व्यापाºयांमध्ये घबराट पसरली. त्यातून लिलावात सहभाग घेण्याचे टाळले. त्यामुळे सकाळ सत्रातील कांदा लिलाव होऊ शकले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, सचिव बी. वाय. होळकर यांनी कांदा व्यापाºयांशी केलेल्या चर्चेनंतर दुपारी लिलाव पूर्ववत सुरू झाले. कांदा साठवणूक विरोधात शासनाने कारवाई सुरू केली. त्यामुळे शुक्रवारी येथील लिलाव होणार नाहीत, अशी भूमिका व्यापाºयांनी घेतल्याने शुक्र वार, शनिवार व रविवारी लिलाव बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
सटाण्यात एकाच वेळी तीन छापे
सटाण्यात अधिकाºयांच्या वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकल्याने व्यापाºयांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान येथील कांदा व्यापारी वर्धमान लुंकड यांच्या नाशिक रोडवरील कांदा गुदाम, बाजार समिती आवारातील कार्यालय व निवासस्थानी छापे टाकले. छापेमारीनंतर दिवसभर तपासणी चालूच होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, काही कांदा व्यापाºयांनी खरेदी बंद ठेवली होती.
उमराण्यात व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण
उमराणे येथील कांदा व्यापारी खंडू देवरे यांच्या विठाई आडतच्या कार्यालयावर, नामपूरमध्ये एस. ताराचंद, येवल्यात रामेश्वर अट्टल तर पिंपळगाव बसवंत येथे सोहनलाल भंडारी यांच्या कांदा आडत दुकानावर छापा टाकण्यात आला. दरम्यान आगामी दोन दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारीवर्गाने घेतला आहे.
चांदवडला तीन ठिकाणी छापे
चांदवड येथील कांदा व्यापारी व नगरसेवक प्रवीण रामबिलास हेडा यांच्या बंगल्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील खळे, लासलगाव रोडवरील खळ्यावर सकाळी ७ वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक धाड टाकली. येवला येथेही आयकर विभागाच्या अधिकाºयांनी धाडसत्र राबविले.

नामपूरला छाप्यानंतर आंदोलन
नामपूर येथेही कांदा व्यापाºयाच्या शेडची पथकाने तपासणी केल्यामुळे नामपूरच्या व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद पाडले. छाप्यानंतर कांदा उत्पादकांनी नामपूर - ताहाराबाद रस्त्यावरील बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यात दीपक पगार, प्रवीण सावंत, समीर सावंत, मधुकर कापडनीस यांनी सहभाग नोंदवला.बडे व्यापारी रडारवर
ग्राहकांना महागड्या दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे केंद्राने दर नियंत्रणात आणण्यासाठी कांदा साठवण करण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर विशेष पथकाने ठिकठिकाणी गुदाम तपासणी केली होती. तेव्हापासूनच हे बडे व्यापारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होते.व्यापारीवर्गात खळबळ
येवला शहरातील एका कांदा व्यापाºयाच्या घरासह खळ्यावरही छापे पडल्याने खळबळ उडाली. छाप्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सकाळच्या सत्रात बंद राहिले. दुपारी लिलाव सुरू झाल्याने लिलाव सायंकाळी पूर्ण झाले.
शुक्र वार व शनिवारी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला. छाप्याचे वृत्त समजताच अनेकांनी कांद्याची वाहने माघारी वळविली. याबाबत रविवार, दि. १७ सप्टेंबर रोजी कांदा व्यापाºयांची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाच्या अधिकाºयांनी केलेल्या कारवाईत व्यापाºयांच्या गेल्या महिनाभरातील कांद्याच्या खरेदी - विक्री व्यवहारांची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील सर्व कागदपत्रे अधिकाºयांनी ताब्यात घेतली आहेत. व्यापाºयांच्या निवास्थानीही अधिकारी कागदपत्रे शोधत होते. तपासणीत व्यापाºयांची कांद्याची खळेही सील करण्यात आले असून, तेथे कांदा साठवणुकीची माहिती घेतली गेली. कांद्याची खरेदी केल्यानंतर व्यापारी तो माल खळ्यावर नेतात, तेथून कांदा निवडून तो परराज्यात पाठविण्यात येतो.

Web Title: Thread on onion trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.