अनधिकृत होर्डिंग्ज काढले तीन लाख दंड वसूल : महापालिकेच्या सिडको विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:11 AM2017-12-01T01:11:47+5:302017-12-01T01:12:44+5:30
सिडकोसह परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मोहीम महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत जुने सिडको येथील नो हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
सिडको : सिडकोसह परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची मोहीम महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत जुने सिडको येथील नो हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या सिडको अतिक्रमण विभागाच्या वतीने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविल्यानंतर आता सिडको तसेच अंबड वसाहतीतील अनधिकृत होर्डिंग्ज तसेच बोर्ड काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मनपाने महामार्गाजवळील हॉटेल ज्यूपिटर यांनी त्यांच्या हॉटेलच्या परिसरात विना परवान दोन होर्डिंग्ज लावले होते. त्या होर्डिंग्जची दंडासह सुमारे एक लाख ५३ हजार इतकी रक्कम बाकी असल्याने त्यांना नोटीस बजावून रक्कम भरण्यासाठी मनपाने सांगितले असतानाही त्यांनी रक्कम भरली नाही. यामुळे आज मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवित ज्यूपिटर हॉटेलची दोन मोठी होर्डिंग्ज काढली. राणेनगर येथील एका पेट्रोलपंपालाही परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत होेर्डिंग्जबाबत नोटीस बजावली होती. त्यांनी त्यांच्याकडील दंडासह सुमारे तीन लाख रुपयांची थकबाकी भरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. या मोहिमेत राजेंद्र अहिरे, जीवन ठाकरे, अंकुश आंबेकर, बाळासाहेब सोनार आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.